BMC Assistant Commissioner recruitment
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महापालिकेतील विविध संवर्ग पदावरील पात्र उमेदवारांच्या भरतीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
( BMC Assistant Commissioner and dean recruitment all process will conducted by MPSC )
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ व अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ या संवर्गातील पद भरतीकरीता दिनांक 24 जून, 2021 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून सदर परीक्षेस अनुसरुन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 26 जुलै, 2021 असा आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महापालिकेतील विविध संवर्ग पदावरील पात्र उमेदवारांच्या भरतीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक आयुक्त, बृहन्मुंबई, महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ पदसंख्या- 16 असून एकूण पदांपैकी एक पद कर्णबधीरता अथवा दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिये संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे.
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना