February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जुन्नरमध्ये भिक्खू संघदान व लेणी श्रामनेर शिबिर

खोडद : जुन्नर तालुक्यात नुकतेच पहिले लेणी श्रामनेर शिबिर संपन्न झाले. भिक्खू संघदान व लेणी श्रामनेर शिबिर पाच दिवस चालले. या शिबिरासाठी प्रबुद्ध भारत फाउंडेशनने अथक परिश्रम घेतले.

या शिबिरात श्रामनेर भिक्खूंनी लेणींचा अभ्यास केला. तसेच धम्मलिपीचा अभ्यासही केला. भन्ते महामोग्लायन यांच्या हस्ते श्रामनेर दीक्षा घेण्यात आली. २२०० वर्षांपूर्वी लेणींवर असलेल्या धम्ममय वातावरणाची अनुभूती यावेळी श्रामनेर भिक्खूंनी व भिक्षुणी यांनी या पाच दिवसांत घेतली. या शिबिरात एकूण ४० श्रामनेर सहभागी झाले होते.

या शिबिराचे आयोजन प्रबुद्ध भारत फाउंडेशन जुन्नर, एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह, बोधिसत्त्व यू. ट्यूब चॅनेल, दान पारमिता फाउंडेशन

नाशिक, कोंडाने लेणी संवर्धक संघ कर्जत, एमबीसीपीआर टीम, मावळ लेणी संवर्धक टीम, पिंपरी चिंचवड लेणी संवर्धक टीम, सेव्ह बुद्धा केव्हज् अँड हेरिटज लेणी संवर्धक पुणे, अशोका वारियर्स लेणी संवर्धक टीम आदींनी केले.

रोज पहाटे चार वाजता उठणे. बुद्धवंदना, ध्यानसाधना, धम्मदेसना, साडेसहा ते आठ पिंडपात, नाश्ता व विश्राम, आठ ते अकरा न्याहारी, पिंडपात, विश्राम, दुपारी बारा ते दोन धम्म वर्ग, लेणी स्थापत्यकलेचा अभ्यासक्रम, पाली भाषा व धम्मलिपी वर्ग, दोन ते चार धम्म वर्ग, चार ते साडेचार विश्रांती, साडेचार ते सहा धम्मवर्ग, सहा ते सात धम्मकार्य, सात ते नऊ ध्यानसाधना, धम्मसाधना, नऊ ते साडेनऊ मंगल मैत्री, रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत विश्रांती अशा प्रकारे श्रामनेर भिक्खूंची दिनचर्या होती.

जुन्नरमधील अंबा-अंबिका लेणी येथे मंगलमय वातावरणात लेणी श्रामनेर शिबिर संपन्न झाले.

Bhikkhu Sanghdan and Cave Shramner Camp in Junnar