November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता १० मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थिनीकरिता ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना २०२१

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना
Bharatratna Dr.Babasaheb Ambedkar Special Grant Scheme

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)‘ (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute – BARTI) मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता १० मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थिनीकरिता ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना २०२१‘ (Bharatratna Dr.Babasaheb Ambedkar Special Grant Scheme 2021) सुरु करण्यात आली आहे. सदर संस्था महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. हि योजना शैक्षणिक वर्ष मार्च – २०२१ पासून लागू करण्यात येत आहे. या योजनेसंदर्भातील काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

योजनेचे उद्दिष्ट :-

MH-CET, NEET, JEE इ. सारख्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पुरस्काराची रक्कम :-

इयत्ता ११ वी व १२ वी साठी (प्रती विद्यार्थी) प्रती वर्ष रक्कम रुपये १,००,०००/- (रक्कम रुपये एक लाख) प्रमाणे २ वर्षांसाठी ,००,०००/- (रक्कम रुपये दोन लाख) इतके अर्थसहाय्य पुरविण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचे निकष :-

1)    या योजनेचा लाभ हा शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षापासून पुढील शैक्षणिक सत्रांकरिता लागू राहील.

2)    विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.

3)    सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे आई-वडील/पालक दारिद्रय रेषेखालील असणे किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम २,५०,०००/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पर्यंत असणे बंधनकारक आहे.

4)    सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची (MH-CET, NEET, JEE इ.) करिता पूर्वतयारी करणे करिता देण्यात येत असल्याने विद्यार्थ्याने इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

5)    योजेनेकरिता पात्र विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु.५०,०००/- इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.

6)    योजनेतील उर्वरित ०३ हप्ते ०६ महिन्यांच्या कालावधी नुसार देण्यात येईल परंतु त्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान ७५% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)

7)    पालकांचा उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, जातीचा दाखला इ. पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशी केली जाईल.

8)    अर्जामध्ये खोटे, बनावट, दिशाभूल करणारे पुरावे / कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यास सदर योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल.

शिष्यवृत्तीसाठी अवलंबिण्यात येणारी कार्यपद्धती :- 

1)    सदर योजेकरिता पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी / विद्यार्थिनीचे पालक यांचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

2)    सदर योजनेकरिता अर्ज नमुना आणि योजनेची माहिती ‘बार्टी’ कार्यालयाच्या वेबसाईटवर PDF स्वरुपात उपलब्ध आहे. तसेच सदर योजनेचा अर्ज नमुना व माहितीची PDF तुम्ही खाली नमूद link वरूनही डाउनलोड करू शकता.

3)    बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्जदार विद्यार्थी /पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा.

                    – कार्यालयाचा पत्ता –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)‘,

मुख्यालय : 28 राणीचा बाग, कॅम्प, पुणे – ४११ ००१,

संपर्क क्रमांक : ०२० – २६३३३३३० / २६३३३३३९

 

अधिकृत संकेतस्थळ :

 01)  https://barti.maharashtra.gov.in/

02) https://barti.in/media_inner_new.php?id=VFZSVmR3PT0=

अर्जासोबत आई-वडील / पालकांनी द्यावयाचे स्व-घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारस पत्र सादर करणे अनिवार्य आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/पुरावे उदा. गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती साक्षांकित करून सोबत जोडाव्यात.

योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी बार्टी कार्यालय स्तरावरून करण्यात येईल.

योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व पुढील प्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येईल.

(अ) योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु.५०,०००/- इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.
(आ) योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतीलत्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)

आवश्यक कागदपत्रे :- 

1)    अर्जाचा नमुना. 

2)    विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ.१०) चे मार्कशीट. (साक्षांकित प्रत)

3)    विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ.१०) चे शाळा सोडल्याचा दाखला. (साक्षांकित प्रत)

4)    सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्याचा/वडिलांचा जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत) 

5)    सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा तहसीलदार/सक्षम प्राधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला. (मूळ प्रत) 

6)    विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला. (साक्षांकित प्रत) 

7)    विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंके खाते झेरॉक्स प्रत. (साक्षांकित प्रत)

8)    आई-वडील/पालकांचे विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र. 

9)    विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र. 

10)  कुटुंबाचे पिवळे रेशनकार्ड. (असल्यास प्राधान्य)

टिप :- सदर योजनेसाठी प्राप्त अर्जउपलब्ध निधी तसेच मा. नियामक मंडळाच्या निर्देशानुसार सदरील योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.