June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

6 December : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी मुंबईत बेस्टची विशेष सुविधा

Buddhist bharat

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला शिवाजी पार्क येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन केले आहे. तसेच मुंबई महापालिकेसोबतच बेस्ट उपक्रमातर्फे 4, 5 आणि 6 डिसेंबरला आरोग्य शिबिर, विद्युत व्यवस्था, बससेवा, मोफत अन्नदान आदी विशेष सेवासुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बेस्ट उपक्रमामार्फत दरवर्षी दादर, चैत्यभूमी परिसरात विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येतात.

बेस्टकडून 4 ते 7 डिसेंबर या कार्यकाळात विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. दादर रेल्वेस्थानक येथून चैत्यभूमीसाठी 4 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत दररोज 15/20 मिनिटांच्या प्रस्थांतराने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबरला मुंबईच्या विविध भागांमधून चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्रमांक 200, 241, A – 351 व 354 ही बससेवा प्रवर्तित करण्यात येणार आहेत.

6 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथून प्रवर्तित होणा-या बसमार्ग क्रमांक C 33, A 164, 241, C 305, A 351, 354, A 357, 385, C 440 आणि C 521 या बसमार्गांवर अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येईल. जेणेकरुन नियमित प्रवासभाडयात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहचणे सहज सोपे होईल. 6 डिसेंबर रोजी मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊ इच्छिणा-या अनुयायांकरिता पुढील विशेष बसफे-यांचे आयोजन करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणा-या प्रवाशांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात दैनंदिन बसपास 60 रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहेत.