February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 साठी आर्थिक सहाय्य योजना

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ साठी पात्र ठरले आहेत, अशा उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. ५०,००० आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.


💰 योजनेचे स्वरूप :
पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.

पात्रता :
1) उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
2) यशदा , पुणे संस्थेमध्ये मुख्य परीक्षा २०२१ प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
3) सदर योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीन वेळाच घेता येईल, ज्यांनी यापूर्वी सदर योजनेचा तीन वेळा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

📑 अर्ज कुठे व कसा करावा?

● बार्टी संस्थेने साईटवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.

बार्टी संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा
http://barti.maharashtra.gov.in

● कागदपत्रे : सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत ) व संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून bartiupsc18@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

● कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

📆 अर्ज भरण्याची अंतिम तारीख : दि. १० डिसेंबर २०२१

☎️ संपर्क : ०२०-२६३३३५९६ /२६३३३५९७

 

Advertisement- BARTI-UPSC-Civil Services Mains Examination 2021 Financial assistance Scheme

जाहिरात – BARTI-UPSC-नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 आर्थिक सहाय्य योजना

बार्टीमार्फ त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना सांघ लोकसेवा आयोग नागरी
सेवा मुख्य परीक्षा 2021 साठी आर्थिक सहाय्य योजना

https://barti.in/upload/pdf/1636372568_Marathi_Advertisement-final%20(1)%20(2).pdf

 

अर्जाची प्रिंट : Application Form http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD > BARTIUPSC
Civil
Services Mains Examination 2021 Financial Assistance Scheme Application Form

Application Form for UPSC (Civil Services) Mains Examination 2021

https://barti.in/upload/pdf/1636372717_Application%20form%20Mains.pdf