डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या देशाबद्दल प्रती किती अभिमान होता हे 31 मे 1952 कोलनबिया विद्यापीठ, अमेरिका यांच्या वतीने मानद LLD ( डॉक्टर ऑफ लॉ ) ही पदवी स्वीकारताना म्हणाले !
मी स्वभावाने तापट आहे. मी अनेक बड्या व्यक्तींशी त्यांच्या दिखाऊ कार्यावर प्रच्छन्न टीका करून भांडलोही आहे. पण मि आतापर्यंत एकदाही राजद्रोह केलेला नाही. माझ्या देशातील आजची परिस्तिथी मी परदेशात कदापि उघड करून सांगणार नाही. देशाचा मान कसा व कोठे ठेवयायचा हे मला चांगले कळते. आतापर्यंत मी कोणाही परकीय माणसाजवळ माझ्या देशाबद्दल वाईट बोललो नाही. मग बाहेर जाऊन बोलण्याची शक्यता दूरच.
मी अमेरिकेला जाणार हे समजताच काही लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली, की तेथे मी सरकारी कारभारावर प्रकाश टाकून देशाच्या स्तिथीचे खरे चित्र रेखाटीन. त्या लोकांना मी सांगू इच्छितो, की अधिकारारूढ पक्षाशी व अधिकारावरील गृहस्थांशी माझे मतभेद असले तरी मी त्याकरता देशाची नाच्चकी कधीही करणार नाही. समोरासमोर मी मंत्र्यांशी किंवा सरकार पक्षीय सभासदांशी दोन हात करीन. पण परकीयांदेखत किंवा पेदेशात त्याचा मानभंग करणार नाही.
गांधींजीबरोबर मी गोलमेज परिषदेस होतो. देशाचे हित जपण्याबाबत मी त्यांचेही 200 मैल पुढे होतो हे मी सांगू इच्छितो.
संदर्भ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (BAWS) खंड 17 भाग 3 पान क्र.463
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
Vijay Ranvir , नांदेड
9822758484
More Stories
Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान