December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

ऑगस्ट August

१ ऑगस्ट

• १९२० साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती
•1889 गोपालबाबा वलंकर द्वारा प्रकाशित “विटाळ विध्वंसक”
•१९१८ गुन्हेगारी लोकांची हजेरी बंद करणारे आज्ञापत्रक छत्रपती शाहु महाराजांनी काढले.

२ ऑगस्ट

• १९१९ छत्रपती शाहू राजांनी निर्बंध दूर केला. घटस्फोटाचा
• १९३० ‘पतितपावन’ हे साप्ताहिक पतितपावन दास (केशव नारायण ढोले) यांनी सुरू केले.
• १९४२ भावी राज्यघटनेत हरिजनादि जातीचा दर्जा कायम राहील वगैरे पाच प्रश्नांवर म. गांधींनी हरिजन पत्रकात दिलेली उत्तरे. दै. महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध

३ ऑगस्ट

• १९२८ प्रांतिक समितीवर डॉ. आंबेडकरांची निवड मुंबई काँसिल मध्ये महार वतन बिलावर आंबेडकरांचे भाषण.
• 1947 डॉ. आम्बेडकर स्वतंत्र भारत के प्रथम कानुनमंत्री बने..
• १९२६ ‘जोशी वतन’ नष्ट झाले.
• १९४७ डॉ. आंबेडकरांचा पंडीत नेहरूंच्या मंत्रीमंडळात समावेश

४ ऑगस्ट

• १९२७ सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना बंदी करणारा महाड म्युनिसिपालटीचा ठराव
• 1923 मुंबई काऊन्सिल द्वारा भोले प्रस्ताव पास, सार्वजनिक स्थल अस्पृश्यों के लिये खुले.
• 1932 ब्रिटीश सरकार की घोषणा वर्गोके लिये अलग निर्वाचन बहिष्कृत
• १९२३ – सी.के. बोले यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असणारा ठराव मुंबई विधीमंडळात मांडला.
• १९२३ अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे, विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.

५ ऑगस्ट

• १९३२ डॉ. आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरु केली.
• १९३८ परळ येथील हिंदू पुढाऱ्यांच्या सभेत डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९४७ मुंबई म्युनिसिपल कामगारांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २००१ ची थैली अर्पण
• १९४४ कायदे पंडिताच्या सिलेक्ट कमिटीने हिंदु कोड बिलाच्या प्राथमिक स्वरूपाचा मसूदा तयार करून विचारवंतांच्या अभिप्रायार्थ सादर.
• १९२० पंढरपुरात बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा

६ ऑगस्ट

• १९३७ मुंबई येथे स्वतंत्र मजुर पक्षाची वार्षिक सर्व साधारण सभा
• १९२०- पंढरपूर येथे संत पेठ महारवाड्यात बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा
• शांतता पुरस्कार दिन
• १९३१ दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी आंबेडकरांच्या मागण्यांना चाचपून पाहण्यासाठी गांधींनी पत्र पाठवून स्वतः भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

७ ऑगस्ट

• १९३७ मुंबई येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा.
• 1942 श्रममंत्री डॉ. आम्बेडकर द्वारा चौथी मजदूर परिषद का नई दिल्ली में उद्घाटन
• १९३० नागपूरात डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद

८ ऑगस्ट

• १९२७ अंबरनाथ (ठाणे) येथे अस्पृश्यांची सभा
• 1930 नागपुर-कामठी में डॉ. आम्बेडकर की अध्यक्षता में अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग की परिषद.

९ ऑगस्ट

• १९५६ औरंगाबाद शे.का.फे.की. कमिटीच्या पुढे डॉ. आंबेडकर यांचे भाषण.
• १९२७ अंबरनाथ (ठाणे) येथे अस्पृश्य सभा.
• १९३० नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद,
• १९१८ सुभेदार राधोराम सज्जन घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली दामोदर हॉल परळ मुंबई येथे मिलीटरी पेन्शनर्सची जाहीर सभा. ब्रिटिश सरकारचा निषेध,

१० ऑगस्ट

• १९५१ पं. जवाहरलाल नेहरु यांना हिंदू आंबेडकरांचे पत्र विधेयकासंबंधी
• १९३०- अखिल भारतीय दलित काँग्रेस महिलांचे स्वतंत्र अधिवेशन.

११ ऑगस्ट

• १९४६ पुणे सत्याग्रहात कारावास भोगून आलेल्या स्त्रियांच्या सत्कारासाठी बी.डी.डी. चाळ मुंबई येथे सभा.

१२ ऑगस्ट

• १९४८ डॉ. आंबेडकरांचे हिंदू कोड बिलात योग्य ते बदल करुन संसदेला सादर

१३ ऑगस्ट

• १९२३ सार्वजनिक विहिरी वापरण्याचा हक्क असावा असा ठराव मांडण्यात आला.
• सक्तीचे मोफत शिक्षण घेण्याबाबत मध्यप्रांत कौन्सिलात ठराव पास करण्यात आला.
• १९२१ सक्तीचे मोफत शिक्षण घेण्याबाबत मध्यप्रांत कौन्सिलात ठराव पास करण्यात आला.
• १९२८ सायमन कमिशनच्या मुंबई प्रांतिक कमिटीवर सभासद म्हणून डॉ. आंबेडकरांची निवड झाली

१४ ऑगस्ट

• १९३९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांची मुंबईतील मणि भवन येथे भेट.

१५ ऑगस्ट

• १९४६ स्वातंत्र्य दिन,
• १९३६ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
• 1931 दुसरी गोलमेज परिषद के लिये “डॉ. आम्बेडकर इंग्लंड गये.

१६ ऑगस्ट

• १९४१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दिडोंरा (नाशिक) येथे सभा.
• १९४१ – रूढीवादा विरुद्ध सिन्नर येथील सभेत बाबासाहेबांचे भाषण.

१७ ऑगस्ट

• १९३७ मुंबई असेमब्लित डॉक्टर आंबेडकरांचे मंत्र्यांच्या पगारासंबंधी बीलावर भाषण. पगारासंबंधी भाषण.
• १९३२- ब्रिटिश प्रधानमत्र्यांने जातीय T. निवाडा जाहीर केला.

१८ ऑगस्ट

• १९३८ अस्पृश्य सत्याग्रह कमिटीतर्फे पतितपावनदास यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर सभा.
• १९४७ तिसऱ्या महार बटालियनच्या निःपक्षपाती सेवेबद्दल प्रधानमंत्री व इतरांनी प्रशंसा केली.

१९ ऑगस्ट

• १९४४-वर्गीकृत जातीच्या अनेक संस्थातर्फे कलकत्ता येथे डॉ. आंबेडकरांचा सत्कार.
• १९३५ डिप्रेस्ड क्लासची नागपूर येथे सभा

२० ऑगस्ट

• १९१७ भारत मंत्री मॅटेग्यु यांची पार्लमेंटमध्ये सक्तीच्या शिक्षणाची घोषणा.
• जागतिक धम्म लिपि गौरव दिवस

२१ ऑगस्ट

• १९३६ श्रीलंकेकडून श्री लोकनाथ यांचे बौद्ध धम्म स्विकारणेबद्दल डॉक्टर आंबेडकरांना पत्र.
• १९४१-हिंदू कोड बीलाला पाठिंबा देण्यासाठी भंडारी हॉल, दादर येथे परिषद
• 1955 डॉ. आम्बेडकर द्वारा अस्पृश्यों के लिये स्वतंत्र वसाहत की मांग.
• १९१७ विलायतेत शिक्षण घेत असलेले भीमराव आंबेडकर शिष्यवृत्तीची मुदत संपली म्हणून मुंबईत परतले

२२ ऑगस्ट

• १९३६ स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध.
• १८९६ राजर्षी शाहू महाराजांना मराठी एक्येच्छु सभेचे मानपत्र बोरिबंदर स्थानक, मुंबई.
• १९२० तके महार पंचकमिटीची दुसरी सभा पाचपावली, नागपूर येथे विश्रामजी सवाईतूल यांचे अध्यक्षतेखाली भरली.
• १९३६ स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध

२३ ऑगस्ट

• १९४२ दलितांच्या हाती सत्तासुत्रे सोपवावी -डॉ. आंबेडकर
• १९४५ कलकत्ता येथे दामोधर व्हॅली योजनेवर भाषण.
• १९२० पाचपावली, नागपूर येथे बारके पंच कमिटीची दुसरी सभा.

२४ ऑगस्ट

• १९४० गांधी, कॉंग्रेस यांनी भारतीय राजकारणाचा कसा विचका केला. याचे विश्लेषण करणारी लेखमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनता पत्रकात प्रसिद्ध केली.

२५ ऑगस्ट

• १९२९ दिवे पुरंदर जि. पुणे येथे संत काशिनाथ वाचनालयाचे उद्घाटन,
• १९४६ पुणे येथे शे.का.फे ची कार्यकारिणी बैठक
• १९५२ दादासाहेब गायकवाड यांचे भाषण – औरंगाबाद

२६ ऑगस्ट

• १९४४ कलकत्ता येथे डॉ. आंबेडकरांचा सत्कार
• १९४४-वर्गीकृत जातीच्या अनेक संस्थातर्फे कलकत्ता येथे डॉ. आंबेडकरांचा सत्कार.
• १९५४ राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर डॉक्टर आंबेडकरांचे भाषण.
• १९०२ शाहू महाराजांनी मागासवर्गीयासाठी ५०% आरक्षणाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला.

२७ ऑगस्ट

• १९५० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश.
• १९४२ मजूर मंत्री पदावर रुजू.
• १९५२ जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांची भेट घेतली.
• १९५५ शे.का.फे च्या कार्यकारी मंडळाची डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

२८ ऑगस्ट

• १९३७ वांद्रे येथे धर्मातर हे होणारच असे स्पष्ट केले.
• १९३६- संत नामी सुधारक समाज संस्थेतर्फे नागपूर येथे समाज सुधारणा व शिक्षण या विषयावर जाहीर सभा.
• १९३७– धर्मांतरासंबंधी बांद्रा (मुंबई) येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९३६ नागपूर येथे समाज सुधारणा व शिक्षण विषयावर जाहिर सभा.

२९ ऑगस्ट

• 1947 मसौदा समितिका अध्यक्षपद, भारत के कानुनमंत्री डॉ. आम्बेडकर को दिया गया.
• १९४७ घटना समुदा समितीचे अध्यक्षपद भारताचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले.
• १९३१ दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला प्रयाण.

३० ऑगस्ट

• १९४७ मसुदा समितीची पहिली बैठक
• १९३३ अॅड. आर. डब्ल्यु फुले यांचे अध्यक्षतेखाली नागपूर येथे ना. ई. राघवेंद्र यांचा सत्कार.

३१ ऑगस्ट

• १९५५ डॉ. आंबेडकरांनी ‘मुंबई राज्य कनिष्ठ गावकामगार असोसिएशन’ स्थापन केली.