November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

ब्राम्ही – दैवी लिपि ?

ज्या सम्राट अशोक यांनी भारतातील सर्वात पहिल्यांदा लेखन केले त्यांनी कधी या लिपिला ब्राम्ही म्हटले नाही ज्यांनी ही लिपिचे सर्वात पहिल्यांदा वाचन केले त्यांनी कधी या लिपिला ब्राम्ही म्हटले नाही
मात्र ज्यांनी कधी या लिपिचा शोध नाही लावला किंवा तिचे प्रथम वाचन नाही केले त्यांनी मात्र या लिपिला ब्राम्ही म्हटले
बरं, कारण काय? तर प्राचीन आहे आणि ग्रंथात लिहिले आहे असे स्पष्टीकरण दिले.
त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितले होते की “या” लोकांच्या मनात तेव्हाही आणि आत्ताही ब्राम्ही हा शब्द ब्रम्हदेव पासून तयार झाला म्हणून त्यांना या लिपिला ब्राम्ही म्हणायचे आहे. म्हणूनच वरवर ते ब्रम्हाचा संबंध न देता काही तरी संदर्भ देत होती…त्यात “आपले” काही बालबुद्धी” देखील होती…आणि ब्राम्ही हे नांव कसे ब्रम्हाशी निगडित नाही हे सांगतानाच, ते नांव योग्य कसे याची कसरत करत होते! त्यात शब्दच्छल म्हणून ब्राह्मी की ब्राम्ही असा युक्तिवाद देखील केला गेला जो निरर्थकच नाही तर बालिश आहे!!
मुळात ब्रम्हदेवाशी सर्व जोडायचे होते म्हणूनच कुठलाही वैज्ञानिक आधार न घेता, ब्रम्हाशी जोडून ब्राम्ही नांव देण्यात आले होते हे पाश्चात्य संशोधकांनी देखील मान्य केले होते! काही पुणेरी संशोधकांनी तर आमच्या धार्मिक मान्यतेचा अस्मितेचा प्रश्न आहे असा सूर लावला होता….
हेरिटेज या मासिकात लेखिकेने स्पष्ट लिहिले आहे की ब्राम्ही हे नांव “दैवी”असल्या कारणाने आणि येथील लोकांची समजूत (मान्यता)आहे म्हणून ब्राम्ही नांव देण्यात आले! म्हणजे जी गोष्ट वैज्ञानिक प्रमाणाने सिद्ध होऊ शकत नाही त्याला “दैवी” हा शब्द लावून स्पष्टीकरण दिले आहे…..म्हणजेच हे अधोरेखित होते की भारताच्या सर्वात प्राचीन लिपिचे नांव हे “दैवी समजुती”नुसार दिले आहे हे स्पष्ट होते….
मित्रांनो, हीच गोम आहे! आपण ती ओळखली होती आणि जेव्हा आपण सप्रमाण सिद्ध केले की सम्राट अशोक यांनी लिहिलेल्या भारताच्या प्राचीन लिपिचे नांव “धम्मलिपि” आहे तेव्हा यांचा तिळपापड झाला होता!
शेवटी मनात दाबून ठेवलेले “दैवी” प्रमाण बाहेर आलेच!!!
वैज्ञानिक कसोटीवर आणि मुख्यतः पुरावा असलेले नांव न देता “दैवी नांव” द्यावे ही कुठली मानसिकता?