” भारतीय बौध्द महासभा संबोधी बुद्ध विहार अंबरनाथ (प)आणि किनीकर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने
सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी 7.30 वा . आषाढ पौर्णिमा व वर्षावास प्रवचन मालिका उदघाटन सोहळा २०२३ संपन्न झाला .
कार्यक्रमाचे उदघाटन:— आयु. गणेश किनीकर साहेब ( अध्यक्ष ) यांनी मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलीत करून महामानवांना अभिवादन केले. .
प्रमुख उपस्थीत :— बौध्दाचार्य आयु. प्रभाकर सूर्यवंशी ( सचिव ठाणे जिल्हा भा.बौ.महासभा ) आयु. अशोक चन्ने ( अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका )
आयु. एमपी सपकाळे गुरुजी यांनी वर्षावासाचे महत्त्व या विषयावर सुंदर प्रबोधनात्मक प्रवचन दिले . .
सरचिटणीस अंबरनाथ तालुका मधुकर खंडागळे गुरुजी हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आयु. पी एस खराब गुरुजी
“भा.बौ.महासभा अध्यक्ष संबोधी बुद्ध विहार संतोष पगारे (कार्यालयीन सचिव ,भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका ) प्रकाश कोरके( सरचिटणीस संबोधी बुद्ध विहार) वरील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या मंगलमय प्रसंगी वर्षावास प्रवचन मालिका 2023 पहिले पुष्प आषाढ पौर्णिमेनिमित्त सोमवार दिनांक ३/७/२०२३ रोजी भारतीय बौद्ध महासभा शाखा महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड संबोधी बुद्धविहार ,अंबरनाथ (पश्चिम) येथे संध्याकाळी ७-३० वाजता माननीय पी. एस. खरात गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला असून ३०० पेक्षा जास्त समाज बांधव आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमात विभागातील दहावी ,बारावी ,पदवीधर अशा यशस्वी 21 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे किनीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने १० गरजू पालकत्व हरपलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्षाची शालेय खर्चाची आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आले. त्याबद्दल किणीकर विकास प्रतिष्ठानचे हार्दिक आभार. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना वह्या वाटप व ज्येष्ठ महिला उपस्थित उपासक उपासिका सर्वांना छत्रीवाटप करण्यात आले सरते शेवटी अल्पोपहार वाटण्यात आला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संबोधी बुद्ध विहारातील सर्व सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले त्या सर्वांचे जाहीर आभार. आपला, प्रकाश कोरके (सरचिटणीस)
More Stories
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन