July 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मा.फ.गांजरे यांची जयंती निमित्त लेख….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंडस्वरूपात सर्वात प्रथम प्रकाशित करणारे  मा.फ.गांजरे यांची जयंती दिनांक दि.१ जुलै रोजी असते. त्यांच्या जयंती निमित्त लेख….

प्रा.मा.फ.गांजरे यांनी सर्वप्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व विचार मराठीत प्रकाशित करण्याचे उल्लेखनीय व महत्वपूर्ण कार्य सन् १९६० ते १९७० च्या दशकात केले आहे. त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळीशी संबंधित सर्व बहुमूल्य कागदपत्रे गोळा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शेवटी १९६८ मध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या भाषणांचा पहिला खंड प्रकाशित केला. या प्रमाणे त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचे सात खंड सर्वप्रथम मराठीत प्रकाशित केले आहेत. याच बरोबर धम्मचक्रप्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर सर्वात प्रथम ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीची सुरवातही मा. फ. गांजरे यांनी केली.

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी जे मोठ्या प्रमाणावर ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री होताना दिसते, त्याची सुरवात मा. फ. गांजरे यांनी केली. त्यांची पुस्तके मिलिंद महाविद्यालयात सन १९७३-७४ सालापासून उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंड १८ चा  भाग १,२,३ व खंड १९ ,२० मध्ये प्रा.मा.फ.गांजरे यांच्या भाषणांच्या खंडाचाच संदर्भ घेतलेला आहे.  त्यांची पुस्तके अतिशय दुर्मिळ आहेत. फक्त मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद ; सिध्दार्थ काॅलेज, मुंबई आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर काॅलेज, नागपूर येथेच सापडतात.

अशा या महान साहित्यिकास विनम्र अभिवादन.

***

संकलन – आयु. राहुल जावळे
9819714898