April 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

करु पेरणी बुद्ध, फुले, शाहु, आंबेडकरी विचारांची

बुद्ध, फुले, शाहु, आंबेडकरांना त्रिवार वंदन आमचा
रोवली बिजे विज्ञानाची जनामनात सर्वांच्या
माणसांनी माणसांशी ठेवा मैत्रीचे व्यवहार
असा अमुल्य मंत्र दिला बुद्धांनी जगास
निळ्या निशाणा खाली एक होण्यास सडलेल्या मेंदुतील विषमता नष्ट करण्यास
रोवली बिजे एकतेची धरुन कास शिक्षणाची,
केली काया पालट विषमतेची ,दिली शिकवण समतेची ,
स्वातंत्र्य , समता, बंधुतेच्या आधारावर,
केली नवसमाज निर्मिती
केला विरोध गुलाम करणार्या शोषण व्यवस्थेचा,
बंधन मुक्त करुन माणुस बनविले आम्हास
विषमता व्यवस्थेच्या विरुद्ध
केला वैचारीक उठाव
अस्पृष्यातील वैचारीकांचा होता घेराव
मागासलेल्यांना आणले प्रगतीच्या प्रवाहात,
शाहु महाराजांनी बहुजनांसाठी केला शिक्षणाचा प्रसार,
विषेश भर हा स्त्री शिक्षण प्रसार
मनुवादी धर्म व्यवस्थेशी केले दोन हात
मुक्त केले विळख्यातुन गुलामीच्या

अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012