जातिव्यवस्थेचे निर्मूलन
जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste/ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे बहुचर्चित पुस्तक आहे, याचे प्रकाशन इ.स. १९३६ मध्ये झाले. जात-पात तोडक मंडळाद्वारे आयोजित त्याच्या वार्षिक अधिवेशनासाठी लाहोर येथे मार्च १९३६मध्ये डॉ. आंबेडकरांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु मंडळाच्या सदस्यांनी जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बाबासाहेबांचे भाषण पाहिले तेव्हा त्यांना ते आपत्तिजनक वाटते. मंडळाच्या सदस्यांनी या भाषणात बदल करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना विनंती केली, मात्र डॉ. बाबासाहेबांनी भाषणात कोणतेही परिवर्तन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचा कार्यक्रम रद्द केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच भाषण जसेच्या तसे इ.स. १९३६ मध्ये ‘एनाहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने पुस्तक रूपात प्रकाशित करून टाकले जेणेकरून जास्तीत जास्त लोक याविषयी जाणू शकतील. हा ग्रंथ खूपच गंभीर ग्रंथ आहे. यात डॉ. आंबेडकरांनी जाती-व्यवस्थेच्या आधारावर त्याच्या उन्मूलना संबंधात गंभीर चर्चा केली आहे. जाती व्यवस्थेच्या उन्मूलना संबंधात त्यांनी लिहिले की, ‘‘जर तुम्ही जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेदांना आणि शास्त्रांना डायनामाईट लावावे लागेल, कारण वेद आणि शास्त्र कोणत्याही तर्काने वेगळे करतात आणि वेद व शास्त्र कोणत्याही नैतिकतेपासून वंचित करतात. तुम्ही ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ च्या धर्माला नष्ट करायलाच पाहिजे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.’’
English
Annihilation-Of-Caste-With-A-Reply-To-Mhatma-Gandhi
Marathi
More Stories
🔷डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान Social Contribution of Dr. Babasaheb Ambedkar
ब्रेकिंग चेन्स ऑफ फेट: आंबेडकरांचे सामर्थ्य तत्त्वज्ञान.
आंबेडकरांचा मैत्रीचा आदर्श.