January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

मूल दत्तक घेणे कायदा – अनिल वैद्य, माजी न्यायधीश

दोन मुली दत्तक घेण्याबाबत समाज माध्यमातून एक पोस्ट फार व्हायरल झाली.ही पोस्ट माझ्या वकील ग्रुपवर आली तर मीही फॉरवड केली ,नंतर पोस्टमध्ये दिलेल्या नंबर वरून प्रतिसाद मिळत नाही म्हणून मला फोन येऊ लागले व दत्तक कुणाकडे घ्यावे वैगरे माहिती मागू लागले इत्यादी कारणास्तव ही
पोस्ट लिहत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल केले त्यात दत्तक कायदा सुद्धा केला ,त्याला आज हिंदू दत्तक व निर्वाह कायदा म्हणतात, या कायद्यामुळे स्त्रियांना सुद्धा दत्तक घेण्यासाठी अधिकार मिळाले,पूर्वी स्त्रियांना दत्तक घेण्याचे अधिकार नव्हते. ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात केलेल्या तरतूदी मुळे मिळाले.Hindu Adoption and Mentainanac Act हा कायदा हिंदू,बौद्ध, जैन, शीख यांना लागू आहे.तर इतरांना ward and Guardian Act लागू आहे.
दत्तक मूल हे घेणाऱ्या पेक्षा २१ वर्षाने लहान असावे,१५ वर्षा पेक्षा मोठे नसावे.दत्तक देणाऱ्या आई वडिलांच्या दोघांच्याही सहमतीने दत्तक घ्यावे लागते.दत्तक घेणाऱ्या पतीपत्नी दोघेही सहमत असावे.अविवाहित किंवा विधवा व्यक्ती सुद्धा दत्तक घेवू शकते.
हिंदू दत्तक कायद्याच्या कलम ११ नुसार बालक प्रत्यक्ष दत्तक दिले पाहिजे. दत्तक विधी किंवा दत्तक विधान नोंदणी दोन्ही किंवा दोन पैकी एका प्रकारे दत्तक घेता येते.
दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा बालक अनाथ असते तेंव्हा हिंदू दत्तक कायदा कलम ९(३)(४) नुसार न्यायालयाच्या परवानगी ने दत्तक घ्यावे लागते.
या कायद्या नुसार
बालकांना दत्तक घेण्यासाठी देशभरात लाखो लोकांची प्रतीक्षा यादी आहे. काही वर्षांपूर्वीच महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने बालक दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली . प्रतीक्षा यादीत पारदर्शकता येण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. कायदेशीर प्रक्रिया न अवलंबता कोणी मुलाला दत्तक घेतलं किंवा पकडलं गेलं, तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.
कुणाला जर मूल दत्तक घ्यायचं असेल तर सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स ऑथोरिटीच्या (CARA) वेबसाइटवर नोंदणी करणं अनिवार्य आहे.अनाथ बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्था मध्ये अधिक मार्गदर्शन मिळू शकते.
आपले मूल प्रत्यक्ष दिले पाहिजे अशी तरतूद आहे. म्हणून मूल परस्पर पाठवून देणे वा घेणे अवैध ठरेल.
दत्तक देताना खरेदी-विक्रीसारखी किंमत घेता येणार नाही किंवा मोबदल कोणतीही देणगी अथवा बक्षीस स्वीकारता येणार नाही. असे करणे या हमने तुरूंग व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
दत्तक विधान नोंदविलेच पाहिजे असे कायदा म्हणत नाही. परंतु वाद झाला तर नोंदणी केलेल्या दस्तऐवजाला कलम १६ अन्वये अधिक महत्त्व प्राप्त म्हणून नोंदणी कार्यालयात योग्य तेवढ्या रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर दत्तकपत्र येईल मुद्रांक शुल्कात वेळोवळी जुजबी स्वरूपाचा बदल होत असतो. म्हणून खात्री करावी दत्तक विधान करतांना व मूल वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष देताना घेताना दोन साक्षीदार ठेवणे चांगले.
दत्तक मूल दत्तक घेणाऱ्या मातापित्याचे मूल समजले जाईल व त्याचा जन्म कुटुंबाशी संबंध तुटला असे समजावे अशी कायद्यात तरतूद आहे.
जाण्यापूर्वी मुलास जी काही संपत्ती मिळाली असेल त्यावर दत्तक गेल्या
त्याचा हक्क राहील. परंतु दत्तक गेल्यानंतर त्याच्या जन्मस्थ कुटुंबाने संपत्ती
असेल तर त्यावर त्याचा हक्क राहणारा नाही. दत्तक घेणाऱ्यांच्या दत्तक घेण्यापूर्वी
स्वअर्जित संपत्तीवर दत्तकाचा हक्क राहणार नाही. परंतु दत्तक घेणारे आईवडील दत्तक पुत्रास मृत्युपत्र बक्षीस इत्यादीमार्गे संपत्ती देऊ शकतात. त्यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्क प्राप्त होतो. हिंदू व पोटगी कायदा १९५६ च्या वर उल्लेखित व इतर तरतूदी पूर्ण केल्या नाही तर ते दत्तक विधान अवैध ठरू शकते.दत्तक घेतांना कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच दत्तक घ्यावे.
अनिल वैद्य
(लेखक माजी न्यायधीश असून समाजात विधी साक्षरतेचे साठी त्यांनी विपुल लेखन केले आहे, त्यांचे कायदा (१४ आवृत्त्या) व भारतीय महिला व कायदा(३ आवृत्या),अट्रोसिटी ऍक्ट (२ आवृत्या) ही त्यांची लोकप्रिय पुस्तकं ✍️प्रकाशित आहेत)