July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र

नाशिक-पुणे महामार्गावरील अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हे खरेतर ऐतिहासिक वारसा लाभलेले नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र.

महामानव, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “विदेशातील कॉलोनीयल रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स” या संकल्पनेवर आधारित बाबासाहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि नाशिक संघर्षभूमीचे भूमीपुत्र पद्मश्री कर्मवीर भाऊराव तथा दादासाहेब गायकवाड यांनी निर्माण केलेला असा हा भव्य-दिव्य गृहप्रकल्प आज शहराचा मानबिंदू म्हणून मोठ्या दिमाखात उभा आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 1956 रोजी या सोसायटीत उभारण्यात आलेल्या वसाहतीला व मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहाला भेट दिल्याच्या आठवणींना आज 66 वर्ष पूर्ण झाले आहे.

कालांतराने मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहाचे बांधकाम मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी नवीन भव्य वास्तू निर्माण करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटीच्या सौजन्याने नूतन सभागृहामध्ये नुकताच समाज उपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आला तो म्हणजे ..
राजर्षी शाहू महाराज अभ्यासिका”📕✒️

महात्मा ज्योतिराव फुले स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्र”🎯

संगणक प्रशिक्षण वर्ग 🖥️💻

विशेष सवलतीच्या दरात संगणक प्रशिक्षण वर्ग व अभ्यासिका सर्वांसाठी खुली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावे व अभ्यासिका , संगणक प्रशिक्षण वर्गाचा आणि मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन डॉ. आंबेडकर नगर हाउसिंग सोसायटीच्या वतीने करण्यात येते.

अधिक माहितीसाठी आयु. महेंद्र भालेराव सर

 संपर्क साधावा M.no 7387310748