‘अमोल बच्छाव, नाशिक‘ : लिंगायत समाजात जन्माला आले तरी लहानवयापासून आंबेडकरी चळवळीचे बाळकडू आईने दिले असल्याने आईच्या दशक्रीयेच्या दिवशी मोठ्याप्रमाणात बोधीवृक्षांची लागवड आणि विधी बौद्धधम्म पद्धतीने करत बौद्ध म्हणून संपूर्ण आयुष्य बौद्धधम्माच्या नीतीनियमांनी जगणार असल्याचे जाहिर केल्याची घटना नाशिक येथे घडली.
नाशिक शहरातील वडाळा गावात स्थित असलेले दिलिप किसन लिंगायत हे लहानवयापासूनच आंबेडकरवादी चळवळीशी संलग्न आहेत. वंचित बहुजन आघाडीचे ते ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई किसन लिंगायत यांचे दि. १० जुन रोजी निधन झाले हे कुटूंब सुरुवातीपासून आंबेडकरवाद आणि बौद्ध धम्माच्या विचाराशी जवळ असल्याने दिलीप लिंगायत यांनी आईचा अंतिम सस्कांर आणि दशक्रीया विधी बौद्धधम्म पद्धतीने केला.
इतकेच नव्हे तर दशक्रीयेच्या दिवशी चाळीस पेक्षा अधिक बोधीवृक्षांची लागवड केली, धम्मकार्यासाठी एका धम्मसंस्कार केंद्राला पाच हजार धम्मदान, दोन गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत याबरोबरच दशक्रीयेच्याच दिवशी आम्ही सर्व परिवार याआधीही धम्मआचरणाने जीवन जगत आलो आहोत आणि इथून पुढेही संपूर्ण आयुष्य बौद्धधम्माच्या जीवनमूल्यांसोबत आयुष्य जगणार असल्याचे जाहिर करत क्रांतीकारी पाऊल उचलले आहे.
त्यांच्या या भूमिकेचे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतल्या उपस्थित सर्वच नेते-कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
दिलीप लिंगायत हे तरुण वयापासूनच सामाजिक, राजकीय चळवळीत सक्रीय आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांबरोबरच संत महात्म्यांचे विचार केवळ कथन करुन चालणार नाही तर ते आचरणात आणावे लागतील. फुले-शाहू-आंबेडकरांनी जातीअंताची लढाई लढली, कृतीतून संदेश दिले. विधवांना सन्मानाने वागणूक मिळावी हे ही विचार महापुरुषांनी मांडले.
संत बसवेश्वरांच्या विचारातही हाच संदेश आहे. या सर्वांचा विचार करत त्यांनी तत्कालिन परिस्थितीत जन्माने बौद्ध कुटूंबातील एका विधवा महिलेशी विवाह करुन संसार थाटला. असा क्रांतीकारी विचार ते सुरुवातीपासूनच जपत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

More Stories
बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के तहत “प्राचीन बौद्ध पुरातत्व कार्यशाला” का ओनलाइन प्रशिक्षण
१० जून स्मृतीपुष्प लेख. आंबेडकरी विचाराचे खरे वारसदार – मा.भी.डांगे