#डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहाय्य योजना
मित्रानो केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन 15,जनपथ,नवी दिल्ली 110001 यांच्या वतीने अनुसूचित जाती(SC)आणि अनुसूचित जमातीच्या(ST)रुग्णांसाठी
1) हृदय शस्त्रक्रियेसाठी 1.25 लाख.
2) किडनी शस्त्रक्रियेसाठी 3.5 लाख.
3) कर्करोग,किमोथेरपी,रेडिओ थेरपीसाठी 1.75 लाख.
4) मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी 1.5 लाख.
5) किडनी किंवा अवयव प्रत्यार्पणासाठी 3.5लाख.
6) पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसाठी 1.00 लाख तसेच
7) इतर जीवघेण्या आजारासाठी 1.00लाख.
अशी आर्थिक मदत मिळते.या मदतीच्या लाभासाठी
1) रुग्ण हा अनुसूचित जाती(SC) किंवा अनुसूचित जमातीचा(ST) असावा आणि
2) वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असावे.
अर्ज करताना खालील प्रमाणपत्रे जोडावीत
1) संपूर्ण भरलेला अर्ज.
2) उत्पन्नाचा दाखला.
3) जातीचे प्रमाणपत्र.
4) राशन कार्ड.
5) आधार कार्ड.
6) वैद्यकीय अधीक्षकांनी प्रमाणित केलेले खर्चाचे प्रमाणपत्र(Estimate Certificate)
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी
Director,Dr.Ambedkar Foundation,15,Jan path,New Delhi -110001
या पत्त्यावर शस्त्रक्रियेच्या 15 दिवस अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे,अधिक माहितीसाठी
011-23320571,
011-23320589,या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा
http://ambedkarfoundation.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन विस्तृत माहिती घ्यावी आणि फॉर्म डाउनलोड करून घ्यावा….
सर्व गरजूपर्यंत माहिती पाठवा
About Dr Ambedkar Foundation
http://ambedkarfoundation.nic.in/aboutus/EXecutives.pdf
Dr. Ambedkar Medical Aid Scheme
http://ambedkarfoundation.nic.in/schemes/Dr.%20Ambedkar%20Medical%20Aid%20Scheme%20(15.01.2018).PDF
More Stories
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य
1 जुलैपासून आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याच्या जागी भारतातील तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने 6,100 शिक्षकांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली