July 9, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार

ज्या पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांनी आपल्या पंचवर्गीय भिक्खूंना “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हा मंत्र देऊन मानवाच्या कल्याणासाठी सुखासाठी दुःख मुक्तीचा मार्ग देऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन केले.
ज्या पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग देणारा गुरु, कल्याणमित्र लाभला.
याच दिनाचे औचित्य साधून आषाढ पौर्णिमा जिला गुरुपौर्णिमा नावाने सुद्धा संबोधले जाते. या दिवसापासून पुढील तीन महिने वर्षावास साजरा केला जातो. आपण सर्व बौद्ध उपासक मोठ्या प्रमाणात ही पौर्णिमा साजरी करत आहोत. या पौर्णिमेनिमित्त जाहीर धम्म प्रवचन आयोजित केले आहे.

🪷 प्रवचनकार:- धम्मचारी ललितसिद्धी (संभाजीनगर)🪷

🌷 गुरुवार दि. १०/०७/२०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता 🌷

👉 ठिकाण:- नागसेन बुद्ध विहार टागोर नगर नाशिक
_____________

🌸 -: आपले विनीत :-🌸
फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, टागोर नगर
🌼 त्रिरत्न बौद्ध महासंघ, नाशिक 🌼
खिर दान – धम्मउपासक सुशांत अहिरे