February 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

गौतम बुद्धांचा अस्थिकलश घेऊन निघालेली पदयात्रा गुरुवारी औरंगाबाद शहरात

औरंगाबाद तथागत गौतम बुद्धांचा पवित्र अस्थिकलश घेऊन निघालेली आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व उपासकांची पदयात्रा २६ जानेवारी रोजी रात्री औरंगाबादेत पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी २७ जानेवारी रोजी शहरात ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत व अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक उपासक, उपासिकांनी जय्यत तयारी केली आहे.

ही धम्म पदयात्रा परभणीहून निघाली असून चैत्यभूमी (दादर) मुंबई येथे जाणार आहे. यात ११० थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू तसेच भारतातील भिक्खू संघ, उपासक यात सहभागी झालेले आहेत. याशिवाय सिनेअभिनेते गगन मलिकही पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. ही पदयात्रा २६ जानेवारी रोजी गुरुवारी औरंगाबादेत दाखल होणार आहे.

जालना रोडवरील केंब्रिज चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपात मुक्काम, तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता औरंगाबादेतून ही पदयात्रा जाईल. रस्त्यात चिकलठाणा, मुकुंदवाडी येथे या पदयात्रेचे स्वागत केले जाणार आहे. पुढे शासकीय दूध डेअरीसमोरील अमरप्रीत चौक येथे दुपारी १२ वाजता बुद्धांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला जाईल. तिथे भिक्खू संघ धम्मदेसना देतील. त्यानंतर तिसगाव येथे पदयात्रेतील सहभागी भिक्खू संघ व उपासकांचा मुक्काम असेल. शहरातील उपासक, उपासिकांनी बुद्धांच्या अस्थींचे दर्शन आणि धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णा भंडारे व मिलिंद दाभाडे यांनी केले आहे…