June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दीक्षाभूमीवर अवतरणार चलित मुद्रेतील बुद्ध मूर्ती ५० फूट उंच अष्टधातूची मूर्ती थायलंडमध्ये तयार होतेय

नागपूर : महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली चलित मुद्रेतील बुद्ध मूर्ती दीक्षाभूमीवर अवतरणार आहे थायलंड व म्यानमार या बौद्ध राष्ट्रातील दोन दानशूर बांधवांच्या मदतीने ही बुद्ध मूर्ती सध्या थायलंडमध्ये तयार होत आहे . ५० फूट उंच असलेली ही बुद्ध मूर्ती अष्टधातूंची असेल , साकारण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात आधीच एक बुद्धमूर्ती आहे . ती सुद्धा थायलंड येथून आलेली आहे बाबासाहेबांना ध्यानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्तीऐवजी चलित मुद्रेतील बुद्ध अधिक आवडायचे . त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेली बुद्ध मूर्ती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पुढाकार घेतला .

भंते ससाई आणि एस . के . गजभिये यांच्या प्रयत्नांतून ही बुद्ध मूर्ती साकारली जात आहे . यासाठी म्यानमारचे फादर गिर व थायलंडच्या रविवान खनजनविसिता या दानशूर बौद्ध बांधवांनी मदतीचा हात दिला . मागील एक वर्षांपासून या मूर्तीचे नियोजन सुरू आहे . ५० फूट उंच असलेली ही अष्टधातूची मूर्ती १० भागामध्ये थायलंडच्या चोनबुरी येथे तयार होत आहे ही मूर्ती तयार झाल्यानंतर जहाजातून ती मुंबईला येईल तेथून रस्ते मार्गाने नागपूरला पोहोचेल . दहा भागातील बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर जोडली जाईल . या कामासाठी थायलंडचेच इंजिनीअर नागपूरला मूर्तीसोबतच येतील .

नागपुरातील दुसरी चलित बुद्ध मूर्ती
नागपुरातील ही दुसरी चलित बुद्ध मूर्ती असेल यापूर्वी नागलोक परिसरात चलित बुद्ध मूर्ती साकारण्यात आली आहे . यानंतर आता दीक्षाभूमीवरही चलित मूटेतील बुद्ध मूर्ती साकारली जाणार आहे .

४ ऑक्टोबरला भूमिपूजन

बुद्ध मूर्तीसाठी दीक्षाभूमीवरील जागा अद्याप निश्चित झालेली नाही . मात्र लक्ष्मीनगर चौक ते चित्रकला महाविद्यालय या मार्गाकडील जागेवर ती उभारण्याची शक्यता वर्तविली जात आहे . येत्या ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन होणार आहे . यासाठी खास थायलंड येथील एक शिष्टमंडळ दीक्षाभूमीवर येणार आहे