August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -६  या ब्राम्हण वर्गाला मनोरंजक तमाशे पाहायचा जणू छंदच जडलेला होता.उदाहरणार्थ १) नर्तकीचे नृत्य, २) गीत गायन, ३) वाद्यांचे संगीत,४) मेल्यातील तमाशे, ५) गाणे म्हणणे, ६) हस्त संगीत, ७) भाटांचे गीत, ८) टमटम वाद्य, ९)सुंदर दृश्य ,१०) चांडाळ द्वारा नृत्य, ११) हत्ती, घोडे, हेले, बकरे, कोंबडे, इत्यादी पशुपक्षी च्या लढाया, १२) लाठीमार, युद्ध, मल्ल युद्ध,बलपरिक्षन, १३) बनावट युद्ध,युद्धाभ्यास, समीक्षा इत्यादी.

याशिवाय विविध प्रकारचे खेळ आणि व्यसने या ब्राम्हण वर्गाला जडलेली होती.उदा. १) चौपड खेळणे,२)फासे फेकणे,३)बहुरूपी चे सोंग.
(याशिवाय व्यसन व खेळाची लांब यादीच बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे.)

उंची आसने बाळगण्याचे व्यसन सुद्धा ब्राम्हणांना जडलेले होते.याशिवाय या ब्राम्हणांना स्वतःला शृंगारित करण्याची पण सवय होती.चर्चेचे नानाप्रकर ब्राम्हणात अस्तित्वात होते.याशिवाय वादविवाद करणेसुद्धा ब्राम्हण वर्गाला आवडत असे.प्रतेक गोष्ट ब्राम्हण वर्ग आपके स्वार्थ साधण्याच्या हेतूने करीत असे.

जिविका कमाविण्याकरिता ब्राम्हण वर्ग वाईट‌ मार्गाचा अवलंब करीत .याकामी ब्राम्हण भविष्य सांगण्यासारखा हलक्या कलेचा उपयोग करीत.

१. हस्तरेषा पाहणे,. २) शकुन अपशकून , ३)विजा कडाडल्या स भविष्यवाणी करणे, ४.अग्निला आहुती देणे, ५. चमच्याद्वारे आहुती देणे, ६. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन करणे, ७.दृष्ट आत्म्याचे आत्म्याचे संतुस्तीकरांन,. ८. शारीरिक लक्षणावरून भविष्य सांगणे,. ९. स्वप्नांना बद्दल भविष्यवाणी,

क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती