August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -३ प्राचीन शासनप्रणाली : आर्याची शासनप्रणाली

बौद्ध धर्म ही एक क्रांती. होती.फ्रान्सच्या क्रांती एवढीच री महान क्रांती होती.जरी ही धार्मिक क्रांती असली तरी ती धार्मिक क्रांती पेक्षाही मोठी होती. ही क्रांती पुढे सामाजिक व राजनैतिक क्रांतीत परिवर्तित झाली. या महान सामाजिक क्रांतीचे चरित्र समजण्याच्या पूर्वी तत्कालीन समाजाची अवस्था कशी होती. हे समजणे आवश्यक आहे.फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास भारताच्या प्राचीन सामाजिक अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे.

बुद्धाच्या शिकवणीतून झालेल्या महान सामाजिक क्रांतीला जनाण्यापूर्वी हे आवश्यक आहे की तत्कालीन आर्य समाजाची विकृत परिस्थिती कशी होती ? बुध्द पूर्व काळाचा आर्य समाज सामाजिक , धर्मीक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निकृष्टेतेचा अगदी खालच्या स्तराला पोचलेला होता .आर्यात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या काही वाईट सामाजिक चालीरीती प्रचलित होत्या .याचा उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे.

.१. त्या काळच्या आर्य समाजात मद्यपान व जुगार. खेळण्याचे सर्रास प्रचलन होते.प्रतेक राजाकडे जुगार खेळनारा विशेषज्ञ नोकरीला असायचा .हा जुगार खेळण्यासाठी राजाच्या महालाशेजारीच .एक मंडप बनविलेला. असे.
क्रमशः

प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती