१४-१०-१९५६ रोजी म्हणजे अशोक विजयादशमी दिनी महाराष्ट्रातील महार समुदायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून सिद्धार्थ गौतम बुद्धांचा बौध्द धम्म नागपूर येथे स्वीकारला….
आज आपण आंबेडकरी बौध्द आहोत आणि बौध्द तत्वज्ञान अंगिकारतो आहे त्याचा स्वाभिमान आहे आणि जागतिक क्रांती होऊन मानसिक, सांस्कृतिक परीवर्तन प्रचंड प्रमाणात झाले आहे हे निर्विवाद सत्य आहे.
आंबेडकरी बौध्द समुदाय हा अंधश्रध्दा मुक्त होऊन वैज्ञानिक प्रगत झालेला आहे.
खरे आणि खोटे काय याची शहानिशा करण्याची बुध्दी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रात असंख्य बुद्ध विहार बांधण्यात आलेले आहेत आणि पुन्हा बांधणे सुरूच राहणार आहे कारण मानवी जीवन पारदर्शक जगण्याचा मार्ग आणि आचारसंहिता बुध्द विहारातून मिळत असते.
आंबेडकरी बौध्द समुदायात असंख्य छोटे छोटे राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत त्यामुळे अनेक राष्ट्रीय नेते झालेले आहेत……..
भावनिक राजकारणामुळे बरेच बुध्दीवंत लोक वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत त्यामुळे ते बुध्द विहारात राजकीय नेत्यांची किंवा जे बौध्द धर्मीय नव्हते त्यांचे फोटो विहारात लावायला सांगतात आणि त्यांचे अंध भक्त अनेकांचे फोटो लावतात हे बुध्द विहार आचारसंहितेचा भंग करणारी कृती आहे.
बुध्द विहारात फक्त आणि फक्त सिध्दार्थ गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच फोटो लावायला पाहिजेत कारण ती बुद्ध विहार आचारसंहिता आहे.
राजकीयदृष्ट्या भावनिक न होता किंवा वैफल्यग्रस्त न होता बुध्द विहाराचे पवित्र जपावे.
ऍड . शंकरराव सागोरे
MBA,PGDBA,LLM.
प्रोफेसर कॉलनी, नगीनाबाग,चंद्रपूर..
मो.7875762020
More Stories
पुढील पिढी बौद्ध का घडत नाही ?
तथागताचे अंतिम भोजन – राहुल खरे
मानवी समाजाला उपयुक्त ठरणारी मैत्री भावना – डॉ. बालाजी गव्हाळे