August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक-२ हे असुर लोक दहा बैलगाड्या भरून जेवण करीत .ते महाकाय आकाराचे राक्षस असतं.ते सहा महिने झोपत.त्यांना दहा मुंडके होते.हे .’ राक्षस लोक कोण आहेत? याना अमानवीय ‘दैत्या ‘ प्रमाणे दर्शवण्यात आले आहे. आकारात ,भोजन करण्याच्या प्रकारात व जगण्याच्या सवयी पाहता असून लोक हे राक्षस समान होते असे यांचे वर्णन केले गेले आहे.

प्राचीन भारताच्या इतिहासात नागांचा उल्लेख वारंवार आढळतो.परंतु हे .’नाग ” लोक कोण होते? या नगाना ‘साप’ या अर्थाने दर्शवण्यात आले आहे.काय हे खरे आहे? हे खरे असो वा खोटे परंतु लोकांची धारणाच अशी बनलेली आहे. हिंदूचा यावर पूर्ण विश्वास आहे.* प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर करणे अत्यावश्यक आहे.* ब्राम्हणवादी लेखकांनी वेडसरपनाने लिहिलेल्या प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे हे आवरण दूर केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकत नाही.

परंतु या ब्राम्हणवादी मलब्याखाली दबलेल्या इतिहासवरिल आवरण बौद्ध ‌ साहित्याच्या मदतीने दूर करता येणे शक्य आहे.बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राम्हणवादी मलबा दूर केल्यावरच प्राचीन भारताचे वास्तविक स्वरूप आपणास स्पष्टपणे दिसू लागते.बौद्ध सहित्यावरून देव हे मानव समूहातील सदस्य होते,हे स्पष्ट होते.बरेचसे देव लोक बुद्धाकडे आपल्या शंकाचे निरसन करण्यासाठी यायचे.याशिवाय बौद्ध धर्माचे प्रामाणिक साहित्य या नागासंबधित जटिल प्रश्नावर प्रकाश टाकते.

‘अंड्यातून निघालेले साप व * गर्भातून जन्मलेले नाग यातील फरक हे साहित्य आपणास सांगते.अशा प्रकारे ‘नाग ‘ या शब्दाचे दोन अर्थ होतात.यावरून ‘नाग ‘ हा शब्द विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आला आहे हे स्पष्ट .

याशिवाय असुर हे राक्षस नव्हते.ते सुद्धा जन विशेष मानव होते.शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार असुर हे सृष्टीचे निर्माते प्रजापतीचे वंशज होते.अचानक ते नरकदुत कसे बनले? पृथ्वीवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी देव व असुर लोकात तुंबळ युद्ध झालीत .यावरून हे सिद्ध होते की असुर हे राक्षस ( दैत्य ) नसून मानव समूहातील लोक होत.बोध्द साहित्याच्या. मदतीनेच ब्राम्हणी साहित्याचे भारताच्या इतिहासावरील आवरण दूर केल्यावरच भारतीय. इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकते.
क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती