September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा

बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित भंते विनाचार्य यांचा जनसंवाद

दिनांक : शनिवार, 16 ऑगस्ट 2025 | वेळ : दुपारी 12.00 वा.

स्थळ : कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर.

सादर निमंत्रण

आपल्याला कळविण्यात येत असताना अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढा सुरू आहे. ही लढाई गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयांपर्यंत आपल्या हक्काचे, आपल्या अधिकारात प्राप्त करण्यासाठी सुरू आहे.

अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेला हा लढा पुढे पूज्य भंते सुरई ससाई नागार्जुन यांनी जिवंत ठेवला. अनेक वर्षानंतर आकाश लामा, भंते विनाचार्य, भंते केके राहुल, भंते सुमित रत्न, यांच्या प्रमुख नेतृत्वात हा लढा पुन्हा सुरू झाला. पाहता पाहता या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा सुद्धा जाहीर केला.

अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः सहभागी झाले.

बी.टी. अक्ट-1949 निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधि महाविहार मुक्त आंदोलनाचे मुख्य संयोजक भंते विनाचार्य यांचा जनसंवाद महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. महाबोधी महाविहार मुक्ती लढा अजून तीव्र गतीने करण्यासाठी या धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपणास नम्र विनंती आहे की, तन-मन-धनाने या यात्रेला आपण सहकार्य करावे ही, नम्र विनंती.

सर्व गट-तट, मतभेद बाजूला सारून आपल्या अस्तित्व आणि अस्मितेच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

धन्यवाद !

नमो बुद्धाय, जय भीम !

महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्म ध्वज यात्रा

दिनांक : रविवार, 17 ऑगस्ट 2025 | वेळ: सकाळी 9.00 वाजता स्थळ : दीक्षाभूमी येथून प्रारंभ