August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणा करीता चेक लिस्ट

महाराष्ट्र शासन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यावतीने शैक्षणिक जात पडताळणी साठी लागणार पेपर लिस्ट          (  कागदपत्रे ) (शैक्षणिक प्रकरणा करीता चेक लिस्ट)

* bartievalidity.maharashtra.gov.in किंवा https://ccvis.barti.in/ CCVIS या संकेतस्थळावर online भरलेल्या अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) (नमुना-१६) व चलन पावती

* संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी स्वाक्षरी व शिक्यासह दिलेले नमुना-१५ (अ) प्रमाणपत्र व बोनाफाईड मूळप्रत

* अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत. (जातीचे प्रमाणपत्रावरील नांव, जात, प्रवर्ग इत्यादी तपशील बरोबर असल्याची खात्री अर्जदारांनी करावी.)

* नमुना – ३ मध्ये वंशावळी शपथपत्र. (दंडाधिकारी / नोटरी यांचेसमोर केलेले.) (अर्जदाराचे वय-१८ वर्षापेक्षा कमी असेल तर शपथपत्र पालकांनी करावे. तसेच सदर शपथपत्र साध्या कागदावर करावे. रु.१००/- किंवा रु.५००/- चा बॉन्ड पेपर वापरण्याची आवश्यकता नाही.)

* नमुना-१७ मध्ये शपथपत्र. (दंडाधिकारी/नोटरी यांचेसमोर केलेले.) (अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी असेल तर शपथपत्र पालकांनी करावे. तसेच सदर शपथपत्र साध्या कागदावर करावे. रु.१००/- किंवा रु.५००/- चा बॉन्ड पेपर वापरण्याची आवश्यकता नाही.)

* अर्जदाराचा स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा याची प्रमाणित प्रत.

* अर्जदाराचे वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा याची प्रमाणित प्रत.

* अर्जदाराचे वडील अशिक्षित असल्यास वडील अशिक्षित असलेबाबत शपथपत्र सादर करावे व जन्म प्रमाणपत्र जोडावे तसेच पर्याय म्हणून अर्जदाराचे सख्खे चुलते किंवा सख्खी आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा याची प्रमाणित प्रत सादर करावी.

* अर्जदाराचे आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा याची प्रमाणित प्रत किवा गाव नमुना नंबर-१४ जन्म नोंद याची साक्षांकीत प्रत सादर करावी.

* अर्जदाराच्या आजोबाचे भाऊ किंवा बहिण यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जनरल रजिस्टर उतारा याची प्रमाणित प्रत सादर करावी.

* अर्जदार यांचे पंजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला किवां गाव नमुना नंबर १४ उतारा. (जन्म/मृत्यू नोंद)

* अर्जदार यांचे खा. पंजोबा, चुलत पंजोबा, चुलत आजोबा यांचे गाव नमुना नंबर १४ उतारा (जन्म/मृत्यू नोंद) किवां खरेदीखत ज्यावर जातनोंद नमूद आहे, अन्य जात नोंद असलेले पुरावे.

* अर्जदाराचे सख्खे भाऊ, सख्खी बहिण, वडील, सख्खे चुलते, सख्खी आत्या, आजोबा, सख्खा चुलत भाऊ, सख्खी चुलत बहिण इत्यादी वडीलाकडील रक्तनातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत

* जातनोंद असलेले इतर महसुली पुरावे. ( ज्यामध्ये जातनोंद नमूद आहे )

* गाव नमुना नं. १४ चा जन्म / मृत्यू नोंदीचा पुरावा असल्यास त्याची प्रमाणित प्रत ( Certified Copy ) सादर करावी. तसेच सदर पुराव्यातील व्यक्तीचे नाव वंशावळी शपथपत्रात नमुद करुन त्या व्यक्तीशी नाते सिध्द करण्यासाठी वारस फेरफारनोंदी, हक्कपत्रक गाव नमुना नं ६, क. ड.ई पत्रक, गाव नमुना ७/१२ उतारा, खरेदीखत, कर- पावती, इत्यादी महसुली पुराव्याच्या प्रमाणित प्रती (Certified Copy) सादर कराव्यात.

* वरील कागदपत्रे/पुरावे क्रमनिहाय जोडून नागरी सुविधा केंद्रात सादर करावेत.

महत्वपूर्ण सूचना : जात पडताळणी फॉर्म डायरेक्ट नागरी सेतू केंद्र अधिकृत सरकारी ऑफिस मध्ये जमा करावे ( अधिकृत प्रशासकीय ऑफस आणि अधिकारी यांच्या कडेच संपर्क करावा, कार्यालय जवळील दलाल लोकांपासून सावध रहाणे )

प्रमाणपत्र तपासणी ऑनलाइन सत्यापित करा

आपला अर्ज ऑनलाईन शोधू शकता ( ट्रॅक अ‍ॅप्लिकेशन ) https://ccvis.barti.in/track_application.php

प्रमाणपत्र तपासणी ऑनलाइन सत्यापित करा , जात वैधता ऑनलाइन बघा https://ccvis.barti.in/caste_validity.php