April 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

गुंतवणूकीची साधने ते थेट गुंतवणूकीच्या साधनांचे झालेले आधुनिकीकरण – सागर वाघ

बुद्धिस्ट भारत या वेब पोर्टलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या सदरात आपण प्राचीन काळापासून वापरली जाणारी गुंतवणूकीची साधने ते थेट गुंतवणूकीच्या साधनांचे झालेले आधुनिकीकरण याचा प्रवास जाणून घेणार आहोत.

गुंतवणूक ही प्राचीन काळापासून संपत्ती वाढवण्याचे प्रभावी आणि सुरक्षित साधन मानले गेले आहे. गुंतवणूक ही काळानुसार बदलली असली, तरी तिचे महत्त्व कायम आहे. भुतकाळातील गुंतवणूक ही प्रामुख्याने सोनं, जमीन, सावकारी, पतसंस्था इत्यादी मध्ये केली जात होती. सोनं हे प्राचीन काळापासून संपत्तीचे प्रतीक आणि सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते. भारतात सोन्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. सोन्यात गुंतवणूक ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा आणि आर्थिक सुरक्षितता वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

जमीन गुंतवणूक ही प्राचीन काळापासून संपत्ती वाढवण्याचा आणि सुरक्षिततेचा प्रभावी मार्ग मानला जातो. भारतात जमीन ही केवळ मालमत्ता नसून प्रतिष्ठा, संपत्ती आणि वारसाहक्काचे प्रतीक मानली जाते. प्राचीन काळी आणि आधुनिक युगातही जमीन गुंतवणुकीचे स्वरूप बदलत गेले, पण तिचे महत्त्व कायम राहिले आहे.

क्रमशः

© सागर वाघ
(लेखक म्युच्युअल फंड आणि हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहेत.)