December 28, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा मोर्चा आंदोलनातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Nashik

(दि.२३) दुपारी शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व समाज नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नाशिक : परभणी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अन् संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दोषींना त्वरीत ताब्यात घ्यावे. शांततेत आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण देशवासीयांची त्वरीत माफी मागावी, यासाठी ‘आम्ही संविधानवादी‘ संघटना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले

शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व संविधान पुस्तिकेला पुष्पहार करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना म्हटली गेली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी पोलिसांना अटक करावी, शांततेत आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे, अमित शहा हाय .. हाय… अमित शहा माफी मागा, माफी मागा.. अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात आलेल्या नेते व भीमसैनिकांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच संविधानाच्या प्रतिमा, निळेध्वज, पिवळे ध्वज, निळ्या टोप्या, मफलर्स, स्कार्फ परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधत आंदोलकांनी सीबीएस सिग्नल मार्गे जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
हातात विविध पोस्टर्स घेऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. तेथे काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आपण राज्य व केंद्र शासनाला आमच्या भावना कळवा. त्वरीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी शासनाला आपल्या भावना कळविल्या जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी सीबीएसपासून शालिमारकडे जाणारा तसेच येणारा संपूर्ण रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता.
वाहतूक कालिदास मार्गे वळविण्यात आली होती. मोर्चा नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सीबीएस तसेच मेहर सिग्नल या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात बिपीन कटारे, संदीप मोरे, दामोधर पगारे, दिपक डोके, मुकेश गांगुर्डे, प्रशांत खरात, लक्ष्मी ताठे, कविता पवार, अर्पिता पगारे, संतोष आंभोरे, यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेते बाळासाहेब शिंदे, अर्जुन पगारे, किशोर घाटे, आदेश पगारे, प्रकाश पगारे सनी रोकड़े, संजय साबळे, दीपक ननावरे, आकाश भालेराव, मलिक काळे, दामोदर पगारे, कविता पवार, सिद्धार्थ भालेराव, संतोष आंभोरे, लक्ष्मी ताठे, दीपचंद दोंदे, विजय मोरे, सुनील यशवंते, शशांक हिरे, सिंधुताई शार्दुल, बाळासाहेब शिंदे, राहुल नारनवरे, राजाभाऊ सोनवणे, शरद जगताप,  दिलीप दोंदे, राजू देसले, स्वप्निल पाटील,  करुणासागर पगारे, दिनकर दाणी, अर्जुन पगारे,  मदन निकम, अनिल मोरे, बजरंग शिंदे, रवी पगारे, उमेश गायकवाड, सुनील पवार, विनोद बर्वे, अविनाश पवार, विनोद सोनवणे, विकी चाबुकस्वार, आशिष खांडवे, वैभव साळवे, सुभाष शेजवळ, साहेबराव शृंगार, भारत जाधव, गोपाळ बस्ते, संजय गालफाडे, बाळूभाऊ आठवले, अशोक साठे, अमोल आल्हाट, परशुराम साठे, प्रकाश साळवे, अंबादास अहिरे, चंदू कार कासार, दिलीप साठे, अमोल गोरे, हर्ष आल्हाट, भगवान आल्हाट, कैलास आल्हाट, महिंद्रा जमदाडे, नयन शेजवळ, बाळासाहेब कदम, सचिन नेटारे, राजू थोरात यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शहर, जिल्हाभरातून आंबेडकर आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.