January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक

The Buddha and His Dhamma,

१. तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे.

२. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते.

३. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे.

४. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे.

५. आंब्याची कोय असते. ही कोय आम्रवृक्षाच्या उत्पत्तीचे निमित्त असते. आम्रवृक्ष आम्रफळे देतो.

६. हा आंब्याचा पुनर्जन्म होय.

७. परंतु येथे कोठेही आत्मा नाही.

८. म्हणूनच आत्मा नसला तरीही पुनर्जन्म शक्य आहे.

५. आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे