तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या मंगल पर्वावर तसेच मातोश्री रमाई स्मृतीदिनाच्या पुर्वसंध्येला, रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी व बौद्ध समाज बांधव तसेच हितचिन्तक ब्रम्हपुरी यांचे वतीने भव्य धम्मदीक्षा सोहळा, धम्म सम्मेलन व संगीतमय समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २६ मे २०२४ ला, वन्दनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगण परिसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर ब्रम्हपुरी येथे केलेले आहे.
एकदिवसीय भव्य धम्मदीक्षा सोहळा व धम्म सम्मेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धम्मसेना नायक पुज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई जी व भिक्खु संघ नागपूर हे राहतील. भंतेजी व भिक्खु संघच्या मुख्य मार्गदर्शनात व उपस्थितित भव्य धम्मदीक्षा सोहळा व धम्मदेसना सायं ५ ते ८ या वेळमध्ये राहील. दुपारी ३.३० ते ५ आणि रात्रो ८ ते १० या वेळात, भीम विचाराची बुलंद तोफ, विद्रोही गायक, कव्वाल विकासराजा आणि संच नागपूर यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम गाणे चळवळीचे, प्रबोधन समाजाचे हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमास येताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे तसेच धम्मदीक्षा घेणारे बांधवानी ओळखीचा पुरावा म्हणून कोणताही एक ओळखपत्र सोबत आणावे, तरी प्रस्तुत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन मन धनाने सहयोग करावे हिआपणा सर्वाना आग्रहाची नम्र विनंती. असे आवाहन आयोजन समितीचे संयोजक डॉ केशिप पाटील, अध्यक्ष डेनी शेंडे, उपाध्यक्ष अक्षय भैसारे, अमोल रंगारी, सचिव स्वप्निल उके, सहसचिव गणेश डांगे, कोषाध्यक्ष सिद्धांत फुलझेलें, प्रसिद्धी प्रमुख अमोल सरजारे, वेदांत धोंगडे, सहसंयोजक दिलीप शेंडे, मार्गदर्शक प्रा डॉ युवराज मेश्राम, विधी सल्लागार एड खुशाल खोब्रागडे, सदस्य स्वप्निल मेश्राम, कुणाल सरजारे आदी टीम रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरीच्या सर्व पदाधिकारी सदस्य हितचिंतक मार्गदर्शक सल्लागार यानी केलेले आहे.
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.