July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सातपूर कॉलनीतील जेतवन बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

नाशिक  ( सातपूर ) – येथील धम्म सागर प्रबोधन संघ संचालित जेतवन बुद्ध विहार ट्रस्ट सातपूर कॉलनी व विश्वभूषण डॉ, बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी प्रमुख वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बौद्ध तत्त्वज्ञान,बुद्ध मार्ग व त्याची भूमिका विशद करण्यात आली.तसेच बुद्ध विचार अंगीकारले पाहिजे, त्यांच्या 22 प्रतिज्ञांचा पालन केले पाहिजे, बुद्ध अष्टांगिक मार्ग स्वीकारला पाहिजे असे मनोगतात सांगितले
यावेळी वसंत अहिरे, नारायण मोरे ,सुरेश भवर, दिलीप काळे ,अवधूत वावरे ,किरण साळवे ,विजय लोखंडे ,मधुकर भाले प्रवीण गायकवाड,भीमराव जगताप ,बाजीराव पगारे ,संजय जगताप ,मंगेश जाधव, भारत गांगुर्डे ,आदीं सह धम्मउपासक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी खिर दान करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन मनोज अहिरे यांनी केले तर आभार किरण साळवे यांनी मानले