Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.
सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन : माथेरान हे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. अनेक परदेशी पर्यटक देखील माथेरानला आवर्जून भेट देतात. शुद्ध आणि थंड हवा तसेच दऱ्या-खोऱ्यांमधून दिसणारे विहंगम दृश्य… माथेरानचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. चोहीकडे हिरवळ, डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि समोरचं माणुसही दिसणार नाही इतकं दाट धुकं… पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अधिकचं खुलून दिसते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे स्वर्ग सुखचं म्हणावे लागेल.
Matheran Hill Station : सध्या रोड ट्रीपचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण फिरण्यासाठी लाँग ड्राईव्हचा प्लान करतात. स्वत:च वाहन असलं की अनेक ठिकाणं एक्सप्लोर करता येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असं पर्यटन स्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते.
आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन
माथेरान हे फक्त महाराष्ट्रातीलचं नाही तर आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. यामुळेच प्रदुषण मुक्त पर्यटळ स्थळ म्हणून देखील माथेरान ओळखले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगां मध्ये 2600 फुट उंचीवर वसलेल्या माथेरान शहरात वाहनांना प्रवेश नाही. माथेरान हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 803 मीटर उंचीवर आहे. मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाट चढल्यावर माथेरनच्या पायथ्यापर्यंत जाता येते. वाहने फक्त इथं पर्यंतच जातात. येथून गेल्यावर माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. चालत, ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. मात्र, अनेक पर्यटक पायी चालतच निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात.
More Stories
New IRCTC Train Ticket Reservation Rules : भारतीय रेल्वेच्या नियमानुसार आताचार महिन्यांचा तिकीट बूक करण्याचा नियम रद्द
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई – नागपूर विशेष रेल्वेगाड्या
जपानमधील जगातील उंच ब्राँझ बुद्ध पुतळ्याची साफसफाई World’s Tallest Bronze Buddha Statue in Japan Undergoes Annual Cleaning