डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज अभ्यासिकेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी अभिवादन पर मनोगत व्यक्त केली तसेच याप्रसंगी आपल्या परिसरातील टाकळी (सध्या काठे गल्ली) येथील विद्यार्थी मयूर अहिरे यास पुढील शिक्षणाकरिता रुपये 24,500 चा मदत निधी देण्यात आला.
मयूर हा तृतीय वर्ष बी.टेक केमिकल इंजीनियरिंग IIT मुंबई येथे शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबात आई व दोन बहिणी आहेत. वडील प्लंबिंग चे काम करत असताना अपघाती निधन पावलेत. आई बिर्ला हॉस्पिटल येथे मदतनीस म्हणून काम करते. अहिरे कुटुंबाची एकंदरीत आर्थिक परिस्थिती नाजूक असल्या कारणाने मयूरच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
मयूरने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण केजी मेहता हायस्कूल येथे पूर्ण केले तसेच बारावी सायन्स बिटको कॉलेज येथून पूर्ण करून वडिलांचे निधन झाले असल्याकारणाने सेल्फ स्टडी करून IIT प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
प्रत्येक सेमिस्टरला त्याला साधारण 42000 रकमेची फीची पूर्तता करावी लागत आहे.
सामाजीक कृतज्ञता निधीचे सदस्य संतोष गवारे, सुषमा गवारे , प्रकाश दोंदे, श्यामभाऊ मोरे , सुधीर भालेराव ,भारत तेजाळे यांनी शैक्षणिक मदतीकरता स्थापन केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधी मधून रुपये 21,000 चा मदत निधी मयूर यास दिला. तसेच आयु. चंद्रकांत तेजाळे काका यांनी तीन हजार रुपये व नानाभाऊ शिंदे यांनी पाचशे रुपये मदत निधी दिला. यापुढे देखील सामाजिक कृतज्ञता निधी मधून मयूर यास वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
आपल्याला देखील जर मयूरला मदत करावयाची असल्यास त्याचा M.no+917248964821
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?