September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Fake Universities : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बोगस विद्यापीठांची यादी

Fake Universities : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या विद्यापीठात प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीने केले आहे.

भारत , नवी दिल्ली :  विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या विद्यापीठांबाबत सावध राहावे यासाठी यूजीसीने ही यादी जाहीर केली आहे. यासोबतच यूजीसीने राज्यांना या विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील ही विद्यापीठे बोगस

भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली

व्होकेशनल युनिव्हर्सिटी , दिल्ली

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (एआयपीएचएस) राज्य सरकारी विद्यापीठ, बीडीओ कार्यालयाजवळ, अलीपूर, दिल्ली-1100036

कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज, दिल्ली

एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाउस, 8जे, गोपाला टॉवर, 25 राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली – 110 008

अध्यात्मिक विद्यापीठ, 351-352, फेज-1, ब्लॉक-ए, विजय विहार, रिठाला, रोहिणी, दिल्ली-110085

महाराष्ट्र

राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर, महाराष्ट्र

उत्तर प्रदेशमधील बोगस विद्यापीठ

नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अचल ताल, अलिगढ, उत्तर प्रदेश

भारतीय शिक्षण परिषद, भारत भवन, मटियारी चिन्हाट, फैजाबाद रोड, लखनौ, उत्तर प्रदेश: 227105

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश

गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश

कर्नाटक

बडगनवी शासकीय जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, (कर्नाटक)

 केरळ

सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णतम, केरळ

पाँडिचेरी

श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, क्र. 186, थिलासपेट, वाजुथवार रोड, पुडुचेरी- 605009

आंध्र प्रदेश आणि बंगालमध्येही बोगस विद्यापीठे

क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, 32-32-2003, 7वी लेन, काकुमनुवरीथोटो, गुंटूर, आंध्र प्रदेश-522002 आणि क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटीचा इतर पत्ता, फिट नंबर 301, ग्रेस व्हिला अपार्टमेंट, 7/5, श्रीनगर, गुंटूर, आंध्र प्रदेश

बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, H.No. 49-35-26, N.G.O. कॉलनी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता

https://www.ugc.gov.in/page/Fake-Universities.aspx