भारतीय बौध्दमहा सभेच्या व याच संस्थेच्या वतीने नाशिक, सातपूर येथील त्रिरत्न बुध्द विहार येथे नुकतीच बैठक संपन्न झाली, बैठकिच्या अध्यक्षस्थानी गुणवंत वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून मोहन अडांगळे उपस्थित होते, या बैठकित विवीध विषयांवर सविस्तर विचार मंथन करण्यात आले.तसेच संस्थेचे नवनिर्वाचित राष्ट्रिय सचिव वाय,डी.लोखंडे आणी प्रा.डि.एम.वाकळे यांचा वाढदिवसही संस्थेच्या वतीने साजरा करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय बौद्ध महासभेची त्रिरत्न बुद्ध विहार येथे संस्थेची बैठकित प्रा.डी.एम वाकळे यांची महाराष्ट्र राज्य कार्याअध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचा सत्कार जिल्हा अंतर्गत नाशिक शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, नाशिक जिल्ह्यातील व शहरातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या. त्यात मनपा मा.अधिकारी शी.ल (SK) काळे यांची नाशिक जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली, मधुकर पगारे यांची दिंडोरी तालुका अध्यक्षपदी, नाशिक शहर पर्यटकपदी विनोद भीमराव काळे, शहर संस्कार सचिव म्हणुन भारत तुकाराम भालेराव, शहर महिला आघाडी पदी रूपाली भालेराव तर करुणा मगर यांची नाशिक शहर समितीवर निवड करण्यात आली. संस्थेचे धम्मउपासक गुणवंत वाघ गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली,याप्रसंगी वाघ यांनी विवीध प्रसंगांचे सम्यक उदाहरणे देऊन बौध्द धम्माची पालेमुळे आणि संस्कार समाजाच्या मनामनात मु्ख्यत्वे म्हणजे युवा वर्गाच्या तनमनात रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्शिय भाषणात प्रभोधिनीत केले,
प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे सचिव वाय.डी लोखंडे,संस्थेचे राष्ट्रीय संघटक तथा समाज भुषन- मोहन आढांगळे, राज्य कोषाध्यक्ष प्रा. डी.एम.वाकळे, नाशिक जिल्हाअध्यक्ष के.के. बच्छाव,जिल्हा महासचिव संजय भरीत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, महासचिव पी.डी खरे, उपाध्यक्ष नितीन मोरे, जिल्हा सचिव अरुण काशीद, सुनील वाघमारे, भामरे, तालुका अध्यक्ष अशोक गांगुर्डे, महासचिव सोमनाथ शार्दुल नाशिक शहर उपाध्यक्ष राजेंद्र साळवे,संजय नेटावटे,गोपीनाथ समुद्रे, नवनीत काळे, नंदू काळे, सौ.भामरे, सत्यभामा वाळवंटे, निकमताई, सौ.मोरे,भारत पगारे, याप्रसंगी विभागातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नाशिक शहर सचिव संदेश उत्तमराव पगारे यांनी केले तर समता सम्यक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्श शिवाजी काळे व विनोद काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकित बी.एम.ए ग्रुपचे संस्थापक मोहन आडांगळे यांनी बौध्दधम्मासह ईतर समाज बांधवांसाठी मोठी घोषणा केली.ते म्हणाले कि, तळागळातील नागरिकांपर्यंत आता शिक्शणाची आोढ निर्माण झाली आहे, परंतु अनेक सामान्य कुटुंबाच्या पर्यंत पैश्या अभावी शिक्शण पोहचत नाही. उदरनिर्वाहासाठी, व्यावसायासाठी, शिक्शणासाठी, लग्नकार्यासाठी पैश्यांची अडचण निर्माण होत असते,प्रसंगी कर्ज सुध्दा उपलब्ध होत नाही,म्हणुन आपण काही दिवसात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दि बुध्दीष्ट् मर्चंट को.आँपरेटिव्ह व्यापारी बँके ची स्थापना करित आहोत, या माध्यमातुन अनेक बेरोजगार युवा-युवतींना हि रोजगार उपलब्ध होणार आहे..व कमी व्याजदरात सर्वसामान्य लोकांना कर्ज उपलब्ध करुन देणार आहोत. लवकरच या बँकेचे शेअर्स सुध्दा संपुर्ण जिल्ह्याभरात उपलब्ध करुन देण्यात येतील. अशी माहिती देण्यात आली.
The Buddhist Society Of India, Nashik
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली