February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Nashik Mahanagar Palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत पशुसंवर्धन विभागात भरती

नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नाशिक महानगरपालिका पशु संवर्धन विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी या पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून २६ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे..

नाशिक महानगर पालिका पशु संवर्धन विभाग भरती २०२३ चे सविस्तर माहिती…

पदाचे नाव आणि पदसंख्या:

पशुधन पर्यवेक्षक – ६ जागा
पशुधन विकास अधिकारी – १ जागा
एकूण रिक्त जागा – ७

शैक्षणिक पात्रता: पशुधन पर्यवेक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या सेवेतून पशुधन पर्यवेक्षक किंवा पर्यवेक्षक म्हणून निवृत्त असणे गरजेचे आहे.

पशुधन विकास अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय शाखेची पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. शासनाच्या सेवेतून पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी म्हणून निवृत्त असणे गरजेचे आहे.

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पशु संवर्धन विभाग, तळमजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी नगर, शरणपुर रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२३

नाशिक महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट: nmc.gov.in

( या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता वाचण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचावी. खालील लिंक खाली दिली आहे.)

या भरती संदर्भात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1RVKJWepzgYykcAKs8TwN0VCD7kMVYEmu/view या लिंकवर क्लिक करा.

वेतनश्रेणी:

पशुधन पर्यवेक्षक – २५ हजार रुपये
पशुधन विकास अधिकारी – ४० हजार रुपये

अर्ज असा करावा: या भरतीकरता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अंतिम तारखेनंतर म्हणजेच २६ सप्टेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज छाननी प्रक्रियेतून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मूळ निवृत्ती झाल्याचा दाखला घेऊन उपस्थित राहणे गरजेचे आहे.