Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना संदर्भात माहिती योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संपूर्ण माहिती असल्याचे खात्री करून अर्ज भरावा.
नविन अर्जासाठी :-
विद्यार्थी माहिती
१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.
बँकेची माहिती
• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
• शाखा
• खातेक्रमांक
• IFSC code
अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :
रिनिवल अर्जासाठी :-
चालू वर्षाच्या बोनाफाईड
मागील वर्षाचे गुणपत्रक
जातीचा दाखला
चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
भाडे करारनामा
रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
मेस / भोजनालय बिलाची पावती
रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही
ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्याने करावयचा ई-अर्ज : https://syn.mahasamajkalyan.in/index.html
अधिकृत वेबसाइट माहिती बघा : https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f
स्वाधार योजना अर्ज कसा भरावा याकरिता व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/embed/NNQ5sB_GkZY
योजना राबविणे मागची उद्दिष्टे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करते.
योजनेचे लाभाचे स्वरूप
अनु.जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. (भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन) या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात.
अटी व शर्ती
• विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा
• विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
• विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
• नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 किमी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
• विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
• इयत्ता 11 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
• इयत्ता 11 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 % (उत्तीर्ण) गुण असावेत./
• या योजनेमध्ये अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची टक्केवारी 40 % इतकी असेल.
संपर्क
संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य,
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
More Stories
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य
1 जुलैपासून आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याच्या जागी भारतातील तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने 6,100 शिक्षकांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली