February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जानेवारी २०२४ मध्ये बौद्धगया येथे श्रामणेर शिबिर

अखिल भारतीय भिक्खू संघ व पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने बौद्धगया मध्ये  अखिल भारतीय भिक्खू संघाच्या विहारात 03 जाने ते 13 जाने 2024 दरम्यान अखिल भारतीय भिक्खू संघाच्या विहारात श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीर भन्ते प्रग्यादीप महाथेरो व अन्य भिक्खुंच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल. सदर श्रामणेर शिबिरात महाराष्ट्रातून व भारताच्या अन्य भागातून उपासक सहभाग घेऊ शकतात. तरी आपणापैकी कोणी श्रामणेर शिबीर करण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर आपले नाव खालील क्रमांकावर कॉल करून नोंदवावे. ( फक्त 30 श्रामणेर करिता  )

( टिप : नोंद असावी सदर श्रामणेर शिबिरात ट्रेन ची तिकीट चार्जेस, बस प्रवास व इतर किरकोळ खर्च येईल. )
चिवर व भिक्षापात्र विहारात उपलब्ध करून दिले जाईल त्याचे कोणतेही चार्जेस नाहीत.

– आयोजक
अखिल भारतीय भिक्खू संघ बौद्धगया व पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई

संपर्क:-
अरविंद भंडारे, 9967692014
शांतारामजी इंगळे, 99607 96827