February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आदिवासी महिलांवर अत्याचाराच्या विरोधात व भिडे च्या विरोधात नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

मणिपूर येथील कुकी समाजाच्या आदिवासी महिलांवर त्यांची भर रस्त्यात नग्नधिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, या अमानवीय अत्याचाराच्या विरोधात व महाराष्ट्रात विष पेरणाऱ्या संभाजी भिडे च्या विरोधात निवेदन देण्यासाठीनाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड ,युवक आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष रवी अण्णा पगारे ,उत्तर महाराष्ट्राचे सदस्य पंडित नेटावटे ,इगतपुरी शहराध्यक्ष रंजनाताई साबळे, दिंडोरी तालुका अध्यक्ष उषाताई गांगुर्डे ,नाशिक शहराध्यक्ष रेखाताई देवरे ,सम्यक आंदोलनाचे महानगर प्रमुख मिहीर गजभिये ,यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री जलज शर्मा यांना निवेदन देऊन मनिपुर येथील नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व मणिपूर राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी करण्यात आली,

त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विष पसरविणारा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीच्या वंशजाचा निषेध करून, त्याने महाराष्ट्रामध्ये देश घडविणाऱ्या महापुरुषांबद्दल अतिशय वाईट विधानं केल्याबद्दल त्यास त्वरित अटक व्हावी व कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी करण्यात आली याप्रसंगी शोभा मोरे, पद्मिनी इंगळे ,सोनाली गायकवाड, सोनाली साळवे, सविता पवार, नीतू सोनकांबळे, वनिता वाळवंटे निर्मला अडकिते, नीता सोनवणे, रमाबाई गांगुर्डे, रंजना आडुळे, रत्ना गोटकर, सीमा गायकवाड, कविता नवाळे, कोमल पगारे, आम्रपाली जगताप, बाळासाहेब जाधव, आरिफ मंसूरी ,विवेक तांबे, दीपक पगारे ,भीमचंद्र शेठ चंद्रमोरे ,विशाल भवर संतोष वाळवंटे, दीपक भंडारी, धम्मपाल वावळे, अमोल चंद्रमोरे ,समीर साळवे, आदी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते समाज भूषण बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले.