January 15, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

एक दिवसीय बुध्द लेणी संमेलन

सकारात्मक चित्र… पितळखोरा लेणीचे !

बुद्ध लेणी कडे उपासक उपासिका यांनी सातत्याने येऊन लेणी येथे धम्म प्रचार प्रसार करावा आपली संस्कृती जतन करावी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या करिता “एक दिवसीय बुध्द लेणी संमेलन” आयोजित केले होते

काल दिनांक ९/७/२०२३ रोजी आदरणीय भदंत धम्मानंद यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणीवर “एक दिवसीय बुध्द लेणी संमेलन” आयोजित केले होते त्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आहे , असेच जर प्रत्येक लेणीवर भंतेजी यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले तर लवकरच वेगळे चित्र दिसून येईल.

दुर्लक्षित असलेल्या पितळखोरा लेणीवर अशा प्रकारचे आयोजन व त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आतापर्यंत करत आलेल्या कामाचे चीज होतांना दिसत आहे…