November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धम्म पदयात्रा प्रस्थान व धम्मदेसना

भारत आपला व्हावा बुद्धमय, प्रण हा मंगल कामी । भव्य धम्म पदयात्रा निघाली, चैत्यभूमीच्या धामी ।।

सप्रेम जयभीम…..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती नंतर बौध्द धम्माची वैश्विक बांधणी व्हावी म्हणून पुन्हा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन, आंतरराष्ट्रीय भिक्खु संघाची ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे. मानवात मैत्रीचे नाते जोडणे, बुद्ध धम्माच्या महान तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, या उदात्त हेतुने ही धम्म पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहे. सर्व भारतीयांना न्याय देणारे संविधान शक्तीशाली करण्यासाठी जगात व देशात शांतता निर्माण व्हावी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी ही ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे. परभणी ते चैत्यभूमी दादर (मुंबई) पर्यंत निघत असलेल्या या पदयात्रा प्रस्थान सोहळया निमित्त भारतात प्रथमच तथागत बुद्धांचा पवित्र अस्थीकलश सुद्धा येत आहे. आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा, तथागत भगवान गौतम बुध्द यांचे अस्थिकलश दर्शन व बुद्ध मूर्ती वाटप तसेच धम्मदेशना सोहळा संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सोहळ्यास हजारो बौद्ध बांधवांनी सहभागी होऊन भारत बौद्धमय करण्याच्या प्रक्रिया गतिमान करावी, ही विनंती.

ऐतिहासिक धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर (मुंबई) जात असताना धम्म पदयात्रचे भव्य स्वागत करण्यासाठी आपण सर्वानी आपआपल्या विभागातील विभागीय , गांव , तालुका , शहर आणि जिल्हा स्तरावर नियोजन कमिटी , समिति च्या माध्यमातून नियोजन करावे जेणे करून पदयात्रचे भव्य स्वागत करता येईल व तथागत भगवान गौतम बुध्द यांचे अस्थिकलश दर्शन घेता येईल.