श्रावस्ती बुद्धविहार शांती नगर सुंदरखेड,बुलडाणा येथे शोर्य दिन उत्साहात साजरा
दि 01 जानेवारी 2023,बुलडाणा. श्रावस्ती बुद्धविहार समिती सुंदरखेड बुलडाणा यांच्या वतीने भीमा कोरेगाव शोर्य दिन शूर वीरांना मान वंदना देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक प्रा आयु कंकाळ सर, निरंजन जाधव सर प्रवक्ता दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया जि बुलडाणा हे होते.
आयु सोनपसारे ताई आणि आयु तुषार खरे या नवनिर्वाचित सदस्य ग्रा पं सुंदरखेड यांची विशेष उपस्थिती होती.
सर्व वक्त्यांनी शोर्य दिनाच्या इतिहासाची उकल केली.
परिसरातील धम्म बांधब बहुसंख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते.
प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन प्रतिरुपांना पुष्प अर्पण करून सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु दीपक गवई यांनी केले.
सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
===============================
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा