जुन्नर तालुक्यातील मान मुकुड, भूत लेणी येथे 25 डिसेंबर रविवारी रोजी धम्मलिपि, शिल्पकला कार्यशाळा संपन्न झाली,
सदर कार्यशाळेस पुणे, सांगली, नाशिक , मुंबई, नवी मुंबई, जळगाव, आदी ठिकाणाहून लेणी अभ्यासक व धम्मलिपि अभ्यासक सह परिवार उपस्थित होते,
मानमुकुड लेणी समुहात जवळपास अजून दोन लेणी समुह आहेत अनुक्रमे अंबिका व भूत लेणी आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आनापान,त्रिसरण पंचशील घेऊन झाली.नंतर सुनील खरे व संतोष अंभोरे यांनी सर्व अभ्यासकांचे स्वागत केले. प्रबुद्ध भारत फाउंडेशन , सिध्दार्थ कसबे, अशोक खरात ह्यांना धम्मरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच उत्कृष्ट असाईनमेंट बनवणाऱ्या सुरेखा जाधव , श्वेता पवार , कीर्ती मेश्राम ,उज्वला मोरे , ज्ञानेश्वर सोनवणे,रवींद्र पडवळ, किशोर सोनवणे, रुपाली गायकवाड इत्यादि विद्यार्थ्यांना बेस्ट असाईनमेंट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, आनंदा साबळे व सुनंदा साबळे बेस्ट कपल पुरस्काराने गौरविण्यात आले,
कार्यशाळेत लेणी इतिहास, शिलालेख, शिल्पकला याविषयी अभ्यास पूर्ण अशी माहिती सिध्दार्थ कसबे यांनी दिली.
धम्मलिपि शिक्षक सुनील खरे ह्यांनी विद्यार्थ्यांकडून शिलालेख वाचन करून घेतले व त्यांचा अर्थ समजून सांगितला.
शेवटी अभ्यासकांची मनोगते व आभारप्रदर्शन केले
कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडली.
अनिल उबाळे, बिपीन रुके, अर्चना वाघमारे, शांता मुलगे, मनीषा साळवे , श्वेता पवार, मंदा खरात, अर्चना गायकवाड, सुनंदा सोनवणे, सचिन म्हस्के, नितीन बागुल, संजय बच्छाव, यशवंत दाणी, किशोर हिरे, साधना गांगुर्डे, इत्यादी जेष्ठ नागरिक ही सहभागी होते .
प्रतिक्रिया- १
लेणी अभ्यासण्यासाठी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा भरत असतात मात्र ह्या ठिकाणी पायऱ्या नसल्याने जेष्ठ नागरिकांची हाल होते,
जुन्नर मधील सर्व लेणींवर जाण्यासाठी पायऱ्या करण्यात याव्यात व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,
सुनंदा सोनवणे( लेणी अभ्यासक)
प्रतिक्रिया- २ दुर्लक्षित लेणींवर दिवसोदिवस लेणी प्रेमींची संख्या वाढत असून पुरातत्व विभागाने मूलभूत सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अतिक्रमण झालेल्या लेणी अतिक्रमण मुक्त कराव्यात ही विनंती आहे.
सुनील खरे , अध्यक्ष
दान पारमिता फाउंडेशन.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा