July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थीधातूना अभिवादन करून महापरिनिर्वाणदिनी मानवंदना-

नाशिक दि.6 डिसेंबर ( प्रतिनिधी )  भारतीय संविधान निर्माते,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीधातूला अभिवादन करून महापरिनिर्वाणदिनी सामुहिक मानवंदना देण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र संचालित रमाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात समाजभूषण कर्मयोगिनी डॉ.शांताबाई दाणी यांनी अथक प्रयत्न करून बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी धातूवर चैतन्य स्तूपाची निर्मिती केलेली आहे.या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील श्रद्धावान बौध्द उपासक उपासिका प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने नियमीत भेट देवून अभिवादन करत असतात. सालाबादप्रमाणे यावर्षी विविध सामाजिक, धार्मिक संस्थाच्या माध्यमातून अभिवादन सभेचे आयोजन करून या ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी जनजागृती करण्यात आली होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी व प्रतिमेची पुष्प, धूप व दीप प्रज्वलित करून सामुहिक बुध्द वंदना संपन्न झाली.
याप्रसंगी नविन नाशिक शाखेचे भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे, सचिन गायकवाड(धम्मकाया फाउंडेशन राज्यसचिव),अनिल बागुल(प्रचारक),निलेश आंबेडकर(निर्वाण फाउंडेशन अध्यक्ष) ,सागर रामटेके(उपाध्यक्ष चारिका फाउंडेशन), आकाश खरे(लेणी संवर्धक), रावसाहेब मकासरे(समाजिक कार्यकर्ते), विनोद त्रिभुवन(त्रिरश्मी लेणी बुध्द विहार उपासक उपासिका महासंघ उपाध्यक्ष),राहूल बनसोडे(नाशिक प्राइम न्यूज) आदी.प्रमुख उपस्थित होते.
यावेळी चैतन्य स्तूपाची आयु.रतन बनसोडे साहेब यांच्या सौजन्याने आकषर्क सजावट करण्यात आली होती. स्तूपाची आकर्षक सजावट पाहण्यासाठी व पवित्र अस्थीचे दर्शन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सदर कार्यक्रमासाठी रमाई कन्या विद्या लयाचे संस्थाचालक मंडळातील पदाधिकारी करुणासागर दादा पगारे, वामन गायकवाड,डॉ. संजय जाधव, नितिन भुजबळ,जितेश शार्दूल,देवीदास गायकवाड, प्राचार्या विशाखा कसबे मॅडम आदी.मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद नरवाडे,प्रशांत त्रिभुवन,प्रविण ढिवरे,सचिन अंभोरे, किरण काऊतकर,भारत भवरे,सतिश तिर्थे, राजहंस निकाळजे यांच्या सोबतच महाप्रजापती महिला संघ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रसिद्धी प्रमुख-मिलिंद बनसोडे , नाशिक
मोबाइल नंबर .  ९९६०३२००६३