July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सम्राट अशोक यांचा शिलालेख पुन्हा ASI कडे सुपूर्द……मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक धन्यवाद

‘एलेन च अंतलेन जंबुदीपसि’ म्हणजेच जम्बुद्विपातील (भारत) सर्व लोक सहिष्णुतेने राहो….असे 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी लिहिले होते.
8 शिलालेखांचा हा बिहार मधील एकमेव लघु शिलालेख आहे. याच शिलालेखावर पांढरा चुना लावून, हिरवी चादर टाकून एका सुफी संताची मजार म्हणून घोषित केले गेले व दर वर्षी तेथे उरूस देखील भरत होता….ASI ने अनेक पत्रव्यवहार केले पण मौलवींनी अतिक्रमण न काढता उलट तेथे दरवाजे लावून कडी कुलूप लावले…..
20 वर्षांपूर्वी मी तेथे गेलो होतो. माझ्या बरोबर काही अभ्यासू मुस्लिम मित्र देखील होते, मात्र आम्हांला त्यावेळेस खूप विनवून देखील प्रवेश दिला नाही….
नुकतीच बातमी आली आहे की मुस्लिम समाजाने स्वतःहून निर्णय घेतला की ही मजार हटवून, सम्राट अशोक यांचा शिलालेख व चंदन पहाडावरची जागा रिकामी केली आहे व 2300 वर्षांपूर्वीचा सम्राट अशोक यांचा शिलालेख ASI कडे सुपूर्द केला आहे….
हा निर्णय घेणारे सर्व मुस्लिम बांधव आणि ASI यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन….
महाराष्ट्रातील बुद्ध लेणी वर अतिक्रमण करून अनेक दशके बस्तान मंडणाऱ्यांना देखील अशी सुबुद्धी लाभो….
अतुल मुरलीधर भोसेकर
9545277410