July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कोंडीवते लेणींवर संविधान दिवस साजरा..

कोंडीवते लेणी येथे दान पारमिता फाउंडेशन नाशिक तर्फे संविधान दिवस धम्मलिपिमध्ये संविधान उद्देशिका लिहून व उद्देशिकाचे वाचन करून साजरा करण्यात आला.

कार्यशाळेची सुरवात 10 मिनिटे आनापान व त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन घेऊन करण्यात आले,
प्रास्ताविक प्रवीण जाधव ह्यांनी केले तर लेणी व शिल्पकलेची माहिती संतोष आंभोरे ह्यांनी दिली, व संपूर्ण लेणी समूहाचा इतिहास सुनील खरे ह्यांनी चालता बोलता सांगितला,
ह्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठया संख्येने धम्मलिपि विद्यार्थी हजर होते,
ह्यावेळी नियमितपणे येणारे धर्मेंद्र झाल्टे ,वंदना झाल्टे, आनंदा खरात , मंदा खरात, श्वेता पवार व सुनील पवार ह्या तीन जोडप्यांना बेस्ट कपल म्हणून त्यांचा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले,
त्यानंतर धम्मलिपि परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या 8 विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले,
त्यानंतर संविधान उद्देशिकाचे धम्मलिपि मध्ये असाईनमेंट बनवणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले,

त्यानंतर सर्व सन्मानार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
चालता बोलता लेणी , शिल्पकला, व शिलालेखांची माहिती घेण्यात आली,
सकाळी सर्व उपासकांच्या नाश्ताची सोय मुंबई मधील दान पारमिता फाउंडेशनचे लेणी संवर्धक टीमने उत्कृष्टरित्या केली होती,
दुपारी स्नेह भोजन झाल्यावर सर्व धम्मलिपि विद्यार्थ्यांचे लेखी पेपर घेण्यात आले,
त्यानंतर कार्यशाळेचा समारोप करण्यात आला,
ह्यावेळी प्रदीप गायकवाड, बिपीन रुके, अनिल उबाळे, आकाश हजारे, रुपाली गायकवाड, मनोज साळवे, सुषमा कदम, सुरेश कांबळे, उमेश बागुल, सुनील पवार, पांडुरंग सरकटे , रविंद्र पडवळ, सुनंदा सोनवणे, नितीन बागुल, यशवन्त दाणी, युवराज बर्वे, सुनंदा साबळे, अर्चना गायकवाड,
व इतर उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Constitution Day Celebration at Kondivate Caves..