अक्कलकोट : नगर पालिकेच्या वतीने मैंदर्गी रोडवरील भीमनगरच्या बाजुला तीन एकर क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे सुमारे सात कोटी रुपयांचे बुद्ध विहार गार्डन साकारत आहे. या विहारामुळे बौद्धधर्मियासह सर्वांसाठी अध्यात्म केंद्र विकसित होणार आहे. माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांनी याकामी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
२०१४ ला कामाची सुरू झाले. सुरुवातीला ७४ लाख रुपये नगरपरिषदेकडून मंजूर झाले होते. २०१६ मध्ये ७४ लाख वाढीव निधी मंजूर झाला. इमारत वॉल कंपाउंडसाठी ५० लाख, समोरील सिमेंट रस्त्यासाठी ४५ लाख, दोन हायमॅक्ससह स्ट्रीटलाइटसाठी ३५ आणि पथदिव्यासाठी ४५ लाख, गार्डन, मुर्ती व स्तुप २ कोटी ४१ लाख रुपये असे आतापर्यंत एकूण पाच कोटी ६४ लाख रुपयांचे काम अंतिम टप्यात आले आहे. गेट ५१ लाखांचा आहे. चार कॉलमवर ३५ फुटी डोम उभारण्यात आला आहे. बुद्धाहस्त मुद्रा, अशोक चक्र, स्तुप, प्रार्थना चक्र, लॉन, पार्क आदीसह भव्य विहार आकारास येत आहे.
डोमसह ५ हजार स्केअर फुटाचे काम पुर्ण झाले आहे. बुद्धविहार, गार्डन, विहारासाठी सुमारे ७ हजार स्केअर फुटाचे बांधकाम झाले आहे. गुमट ३५ फुटाचा आहे. थायलंडवरून आठ फुटांची गौतम्म बुद्धांची पंचधातुची मुर्ती मागवण्यात येणार आहे.
धम्मविचारांच्या प्रसाराचा प्रयत्न : उत्तम गायकवाड, माजी नगरसेवक
हे नुसते बुध्द विहाराचे सर्वसाधारण काम नाही. धम्म विचारांच्या प्रसाराचे काम म्हणून आपला पाठपुरावा सुरू आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील एक भव्यदिव्य विहार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बौद्ध धर्मियांसह सर्वांना कुटुंबीयांसोबत् मनशांती साठी हे आदराचे स्थान असेल.
वाढीव निधीसाठी प्रस्ताव पाठवू : सचिन पाटील, मुख्याधिकारी, अक्कलकोट
दोन वेळा इस्टिमेट रिवाईज झाले. पुन्हा वाढीव निधीसाठी रिवाईज करू. गार्डन अडीच कोटीचे आहे. बिहार व परिसर अडीच कोटीचे बांधकाम आहे. जेवढा निधी मंजुर होता, तेवढे काम झाले आहे आहे. काम वाढल्याचे खर्च वाढला. अजुन दीड कोटी निधीची आवश्यकता आहे. रिवाईज एस्टिमेट शासनाकडे पाठवावे लागेल.
बातमी सोजन्य : योगेश कबाडे
7 Crore Buddha Vihara to be constructed in Akkalkot
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली