November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

विश्वरत्न बौद्ध विहार येथे एक दिवशिय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न…

दि.०९/११/२०२२ बुधवार रोजी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा, भारतीय बौद्ध महासभा नाशिक , विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था नाशिक व समता सैनिक दल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशिय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. आडगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. ठाकरे साहेब , व सहकारी मा. भुसाळ साहेब ,यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रवीण बागुल – जिल्हाध्यक्ष ,राजुभाऊ जगताप -सरचिटणीस, डॉ. राजेश साळुंके- राष्ट्रीय अध्यक्ष – मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय संस्था नाशिक ,मनोज गाडे- जिल्हा कोषाध्यक्ष ,सुरेश नेतावणे- दलित पॅंथर जिल्हाप्रमुख, बाजीराव गायकवाड- निफाड तालुका अध्यक्ष , मिलिंद खरात -रिटायर फायर ब्रिगेड ऑफिसर, संतोष सोनवणे , हर्षाताई चौधरी – राष्ट्रीय उपाध्यक्षा – ऋणानुबंधन महिला व पुरुष हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र नाशिक इत्यादी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांचे आयोजकांच्या वतिने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अनेक भिम सैनिकांनी सहभाग नोंदविला.तसेच समता सैनिक दलाचे प्रशिक्षण घेऊन या मध्ये सामील झाले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जोमाने पुढे नेण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदविला.
याप्रशिक्षण शिबिरामध्ये मेजर हिरामण आहिरे ,मेजर गौतम कर्डक व मेजर मनोज मोरे यांनी समता सैनिक दलातील प्रशिक्षण शिबिरार्थींना परेड घेऊन माहिती दिली.समता सैनिक दलाचे महत्त्व व इतर सर्व माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून व प्रात्यक्षिकातून करून दाखविली. समता सैनिक दलाचे महत्त्व काय आहे हे देखील संपूर्ण दिवसभर शिबिर घेऊन प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितले.
ह्या शिबिरासाठी शरद भाऊराव ढाले, मुंजाजी लक्ष्मण हनवते ,नारायण विलास खिल्लारे ,संतोष साहेबराव वाळवंटे ,रमेश भाऊराव आव्हाड, अनिल सटवाजी मोरे ,साहेबराव संभाजी वाळवंटे, मुंजाजी किसन पटेकर, डॉ.राजेश जयवंतराव साळुंके,सुभेदार मेजर एकनाथ भालेराव, सुरज मुजाजी साळवे, अनिल श्रीराम पटेकर, रमेश नामदेव खिल्लारे , गोमाजी विठ्ठल पुंडगे, भूषण लक्ष्मण वानखेडे, प्रल्हाद उघडे ,रोशन लक्ष्मण वानखेडे इत्यादी प्रशिक्षणार्थीने समता सैनिक दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
राजु जगताप यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.अनिल मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. विश्वरत्न बुद्ध विहार, निलगिरी बाग, औरंगाबाद रोड, यश लाॅंस समोर ,पंचवटी ,नाशिक -३,या ठिकाणी सकाळी ठिक.८.०० ते ६ वाजेपर्यंत शिबिर संपन्न झाले.