February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सर्व धर्म समभाव प्रत्येक सणाचा आदर करून खुतुबुद्दिन शेख साहेब यांनी नाशिक शहरात दिवाळीच्या निमित्ताने साखर वाटप केली

सर्व धर्म समभाव प्रत्येक सणाचा आदर करून खुतुबुद्दिन शेख साहेब यांनी नाशिक शहरात दिवाळीच्या निमित्ताने साखर वाटप केली

खुतुबुद्दिन शेख साहेब यांनी नाशिक शहरात दिवाळीच्या निमित्ताने साखर वाटप केली,  1997  सालापसून ते 2022 पर्यत साखर वाटप करत आहेत पुर्वी ते 100 किलो पासुन ते आता दहा टनांपर्यंत साखर वाटप करत आहे खुतुबुद्दिन शेख साहेब ते स्वतः गरिबातून आले आहे त्यांनी स्वतः गरिबी जळवून पहिली आहे त्यामुळे कोणीही गरीब बांधव, भगिनी व लहान मुले यांना सणाचं आनंद मिळावा त्यामुळे ते अनेक वर्षा पासून साखर वाटपचा उपक्रम करत आहे

१९९७ ते २०२२ पर्यंत गेली २५ वर्षांपासून नाशिक शहरात सामाजिक सलोखा राखून दिवाळी सणानिमित्त सण उत्सव आनंदात साजरा व्हावा म्हणून साखर वाटपचा उपक्रम करत आहे,  नाशिक शहरात गंजमाळ येथे सदर उपक्रम राबविण्यात येत असतो

सदर उपक्रमा बदल बुद्धिस्ट भारत टीमच्या वतीने आयु संतोष अंबोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर उपक्रमास शुभेच्या दिल्या आणि बुद्धिस्ट भारत टीम च्या वतीने जो सामाजिक सलोखा निर्माण करून जो आनंदाचा उत्सव गरिबा नीही साजरा करावा या भावनेचे मनापासून आभार मानले