November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

२२ प्रतिज्ञावर आक्षेप देशासाठी धोक्याची घंटा – अनिल वैद्य

१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे डॉ बाासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना बौध्द धम्माची दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा दिल्या. नुकतेच दिल्ली येथे ५ ऑक्टोबर २०२२ ला १० हजार लोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्या वेळी २२प्रतिज्ञा घेतल्या .त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही .कुणी कोणती खाजगी प्रतिज्ञा घ्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.ही काय मंत्री पदाची सरकारी शपथ आहे काय?की ती विशिष्ठ नमुन्यात राज्यपाल व लोकांसमोर घ्यायची ?
खाजगी प्रतिज्ञा घेणे
हा संविधानाच्या कलम १९नुसार अभिव्यक्ति स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे. हा काय कटरचून केलेला गुन्हा आहे काय?कुणी
कोणत्या धर्माचे पालन करावे हा सुद्धा संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क आहे.पण त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतले.ते प्रकरण असे.
राजेंद्रपाल गौतम हे दिल्लीच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते अनुसूचीत जातीचे आहेत. आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.ते दिल्ली सरकार मधे समाजकल्याण मंत्री होते.दिल्लीला ५ ऑक्टोबर २०२२ म्हणजे अशोक विजयादशमीला १० हजार लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थिती मधे बौध्द धम्माची दीक्षा घेतली.त्या वेळी २२ प्रतिज्ञा घेतल्या.तोच
राजेंद्र पाल गौतम यांच्या विरोधी लोकांनी राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला. दिल्लीत त्यांच्या विरोधात आंदोलन केले . गौतम हे दिल्ली येथे बौद्ध धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली गेली.
गौतम यांच्यावर दुसरा आरोप केला होता की, ऑक्टोबर २०२५ पर्यंत १० कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.
त्यांना धमकीवजा फोन येवू लागले.
विरोधकांचा प्रचंड विरोध बघून राजेंद्र पाल गौतम यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
माझ्या मते २२ प्रतिज्ञाला विरोध करणे ही बाब लोकशाहीवर घाव घालणारी आहे .नागरिकांना वयक्तिक जीवनात
प्रतिज्ञा घेण्याचा हक्क आहे. प्रतिज्ञा त्याने स्वतः स्वीकारली असते त्या मुळे इतरांना त्रास होण्याचे काहीच कारण नाही .त्या मधे कोण्या देव देविता किंवा धर्म यांचा अपमान होण्याचाही मुद्दा नाही.किंवा प्रतिज्ञा घेणारी व्यक्ती दुसऱ्यांना
काही सांगत नसते तर ती स्वतः साठी प्रतिज्ञा घेत असते.
कुणाची बदनामी किंवा धार्मिक भावना दुखावणे तेव्हाच समजल्या जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तसे भाषण देतो किंवा लेखन करतो.
प्रतिज्ञा घेणे म्हणजे काही भाषण नव्हे , लेख सुध्दा नव्हे की, कुणाची बदनामी व्हावी किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात.
२२प्रतिज्ञा केंद्र सरकारने हिंदीत प्रकाशित डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंडात सुध्दा आहेत .खंड 17 मधे असल्याचे खुद्द गौतम यांनी सांगितले पण ऐकते कोण?
गंभीर बाब अशी की,
१९५६ पासून कुणी आक्षेप घेतला नाही.आता ६६वर्षा नंतर संविधान विरोधी ताकत एकवटुन
हा विरोध झाला आहे.त्यात सर्वच संविधान द्रोही समाविष्ट आहेत .देशासाठी ही धोक्याची घंटा आहे.

अनिल वैद्य
१० ऑक्टोबर २०२२
✍️✍️✍️✍️