कान्हेरी बुद्ध लेणी येथे धम्मलिपि , शिल्पकला, व लेणी संवर्धन यावर काल २५ सप्टेंबर रोजी कार्यशाळा संपन्न झाली,
ह्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील खरे होते,
गेल्या 15 दिवसा पासून कान्हेरी बुद्ध लेणी कार्यशाळेची तयारी सुरू होती,
नाशिकच्या दान पारमिता फाउंडेशन तर्फे ही नियोजित कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सुनील खरे, प्रवीण प्रविण जाधव , संतोष आंभोरे , राहुल खरे , इत्यादी प्रयत्न करत होते ,
रविवार 25 रोजी मुंबईतील बोरीवली येथील बुद्ध लेणी येथे लोकांना माहिती व्हावी व जनजागृती , संवर्धनासाठी,व धम्म लिपी प्रशिक्षणा करिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ती संपन्न झाली यावेळी धम्मलिपी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना, धम्मलिपी , थेरवाद , महायान परंपरा व त्यातील प्रतीके यांची सखोल माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांकडून लेणी वर असणारे बुद्ध शिल्प कला,त्याची रचना, तसेच लेण्यातील कोरण्यात आलेली धम्मलिपि त्यामागील असणारा अर्थ, उपदेश,याविषयी, माहिती दिली येथील अनेक शिल्पे समजाऊन सांगितले ,
यावेळी अशोक कालीन धम्मलिपिचे लेखी पेपर घेण्यात आले, त्यानंतर धम्म लिपि प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले दुपारच्या चहाची व्यवस्था चंदा बोके व संतोष जाधव यांनी केली होती,
या कार्यशाळेत, नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, अमरावती, कोकण विभागातुन धम्मलिपि अभ्यासक तसेच प्रत्येक
जिल्ह्यांतुन मोठ्या प्रमाणात या कार्यशाळेत विद्यार्थी व लेणी संवर्धक यांनी मोठ्या प्रमाणात होते,
तसेच या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी, धम्मलिपि प्रशिक्षक सुनिल खरे सर, राहुल खरे सर, प्रविण जाधव, संतोष आंभोरे यांनी विशेष परिश्रम घेतले,
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा